27.7 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home Top News दोन संशयित माओवाद्यांना अटक

दोन संशयित माओवाद्यांना अटक

0
25

गडचिरोली – छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रात दाखल होत असलेल्या दोन संशयित माओवाद्यांना धानोरा पोलिसांनी आज गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास धानोराजवळील चव्हेला मार्गावर ताब्यात घेतल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. मात्र, याबाबत पोलिस विभागाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

खात्रिलायक सूत्रांनुसार, आज सकाळच्या सुमारास छत्तीसगड राज्याच्या परिवहन विभागाकडून नोंदणीकृत एका वाहनातून दोघे जण जिल्ह्यात दाखल झाले होते. हे दोघेही जहाल माओवादी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी धानोरापासून दोन किलोमीटर अंतरावर दोघांनाही ताब्यात घेतले.