आकाशगंगेतील ताºयांच्या वेगाचे रहस्य उलगडले

0
10
आयटीआयतील प्राचार्य मुंडासे यांचे नवीन संशोधन
गोंदिया,दि.02 : आकाशगंगेचे वस्तुमान व वेग तसेच ‘डार्क मॅटर’बद्दल जगातील शास्त्रज्ञांमध्ये एकमत नसल्याने तारांच्या वेगाबाबत वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले. याच विषयावर गोंदिया येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रविंद्र मुंडासे यांनी १४ महिन्याच्या अथक परिश्रमानंतर नवीन संधोधन केले असून ताºयांचे वेगाचे रहस्य उलगडले. याबाबत प्राचार्य मुंडासे यांनी १ डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात पत्रकारपरिषद घेवून आपल्या संशोधनाची सविस्तर माहिती दिली.
प्राचार्य मुंडासे यांनी, तारामंडळातील अत्यंत कठीण व गहण प्रश्नांवर प्रदिर्घ संशोधन केले आहे. या संशोधनातून गुरूत्वाकर्षनाचा नवीन सिद्धात मांडलेला आहे. या सिद्धांतामुळे आकाशगंगेमधील ताºयांचा वेग अधिक सिद्ध करण्यात आलेला आहे. या सिद्धांतानुसार, दिर्घिकामधील ताºयांचा वेग आणि प्रत्यक्ष निरीक्षणानुसार आढळून येणारे ताºयांचा वेग समान आहे. हेसंशोधन भौतिकशास्त्रातील मुलभूत पाया असल्याचे त्यांनी सांगितले.
या सिद्धांतामुळे भौतिकशास्त्रातील अत्यंत जटील प्रश्नांचा उलगडा झाला असल्याचे सांगून प्राचार्य मुंडासे यांनी, या सिंद्धांतानुसार ‘डार्क मॅटर’ या घटकाची आवश्यकता नसल्याचे सांगून आकाशगंगेमधील केंद्राच्या जवळीक तसेच अतिदूर ताºयांचा अचूक गणना करता येणार असल्याचे सांगितले. या सिद्धाताव्दारे संपूर्ण आकाशगंगेचे वस्तुमान व रचना याची देखील अचूक गणना करता येणार असल्याचे प्राचार्य मुंडासे म्हणाले.
…..तारामंडळ विषयी श्री मुंडासे यांनी दिलेली माहिती….
तारामंडळमधील दूर व अतिदूर अंतरावर असलेले तारे जास्त वेगाने फिरत असल्याचे अवकाश संशोधन करणाºया शास्त्रज्ञांना निरीक्षणास आले. सर्वप्रथम जॉन हेन्रीक उर्ट यांनी १९३२ साली दिर्घिकामधील तारे जास्त वेगाने भ्रमण करीत असल्याचे निरीक्षणकेले. त्यानंतर केरॉस बॅबकॉक (१९३९), लुईस वोल्डर (१९५९) व श्रीमती वेरा रूबीन (१९७०) यांनी अधिक संशोधन करून ताºयांच्या गतीचे अचूक मापन करून निरीक्षण केले. सर्व निरीक्ष्ज्ञणाअंती तारामंडळमध्ील सर्व तारे जास्त वेगाने फिरत असल्याचे सिद्ध झाले आहे.
तारामंडळमधील तारे व पींड यांचा वेग न्यूटनच्या गुरूकर्षणाच्या सिद्धांतानुसार कमी असणे आवश्यक आहे. तसेच आईनस्टानइच्या सर्वसाधारण सापेक्षता या सिद्धांतानुसार देखील कमी असणे आवश्यक आहे. परंतु, सर्व तारे दिर्घिकेच्या केंद्राभोवती जास्त वेगाने फिरत असल्याचे निरीक्षणास आल्यावर तब्बल ८५ वर्षानी देखील या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही. या गतीबाबत जगातील विविध शास्त्रज्ञानी जसे मोर्देहोई मिलोग्राम (१९८३), कोपोझिलो व लॉरेटींग यांनी सिद्धांत मांडले. परंतु अद्यापही कोणतेही सिद्धांत या प्रश्नांचा पूर्ण उलगडा करू शकलेले नाही. त्यामुळे हे दोन्ही सिद्धांत या बाबीसाठी लागू होत नाही. भौतिकशास्त्रामध्ये अद्यापपर्यंत या सिद्धांताना स्विकृत करण्यात आले नाही.
सद्यस्थितीत डार्क मॅटरमुळे हे तारे जास्त वेगाने फिरत असल्याचे जगातील बहुतांश शास्त्रज्ञांची धारणा आहे. परंतु, डार्क मॅटरमुळे देखील सर्व घटकांचे अचूक उत्तर सापडत नाही. डॉर्क मॅटर अद्याप सिद्ध झालेले नाही. डार्क मॅटरच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी जगभरात विविध ठिकाणच्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करण्यात येत आहे. परंतु अद्यापपर्यंत डार्क मॅटरचे अस्तित्व शोधण्यात यश आले नाही.
…..प्राचार्य मुंडासे यांची व्यक्तीगत माहिती……..
प्राचार्य रविंद्र मुंडासे हे मुळचे सोलापूर जिल्ह्याचे असून बी.ई. (मेकेनिकल) व एमबीए पदवी प्राप्त केली आहे. बालपणापासूनच विज्ञान व गणित हे विषय त्यांच्या आवडी असून भौतिकशास्त्र हा त्यांचा प्रिय विषय आहे. एका कंपनीत प्रोडक्शन इंजिनिअर म्हणून पाच वर्ष काम केल्यावर २००१ मध्ये एमपीएससी प्रवर्ग दोनची परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय नोकरी केली. दरम्यान, २०१६मध्ये एमपीएससीची परीक्षा पुन्हा उत्तीर्ण होऊन वर्ग  ‘अ’ अधिकारी झाले. आयटीआय गोंदियामध्ये प्राचार्य पदावर ते सध्या कार्यरत आहेत.
…संशोधनाचे महत्व प्रथम देशात पटवून देणार…
तारामंडळातील या नवीन संशोधनाची माहिती व तिचे महत्व प्रथम देशवासीयांना पटवून देणार असल्याचे सांगून त्यानंतरच विदेशात संशोधानाचे महत्व सांगणार आहे. या संशोधानाचे पेटेंट देखील करणार असल्याची माहिती प्राचार्य मुंंडासे यांनी पत्रकार परिषदेत दिली.