वटफळी येथे बौध्द धम्म परिषद आजपासून

0
22

यवतमाळ, दि. १ – तथागतचा आर्य आष्टांगीक मार्ग व मानवता वादाची शिकवण आणि डॉ. बाबासाहेब व महात्मा फुले व शाहू महाराजाचे समता मुलक विचार जनसामान्यापर्यंत पोहचावे या हेतूने सुभेदार रामजी आंबेडकर स्मृती दिनाचे औचीत्य साधून दि २ व ३ फेब्रुवारी रोजी २३ व्या बौद्घ धम्म परिषदेचे आयोजन केले आहे.
या धम्म परिषदेच उद्घाटन भदन्द धम्मप्रिय महाथेरो कपिवस्तू यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त सदानंद महाथेरो (संघनायक) हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.भदन्त यु.पय्या लिंकारा (चिन), भदन्त संघरतन माणके, भदन्त सुगतदंत, भदन्त शिवली (श्रीलंका) भन्ते प्रज्ञा दिप बुध्दगया व थायलंड येथील भिक्यू संघ या निमित्ताने उपस्थित राहणार आहे. प्रमुख मार्गदर्शक खनिकर्म विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे, भैय्याजी खैरकार, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, पंजाबराव वानखडे, उपजिल्हाधिकारी संजय खडसे , दिनेश वानखडे, सचिन मुन, वंत मून, यशवंत गायकवाड, देविदास वाघमारे, किशोर भगत, पुष्पा बोरकर, सुमीत वानखडे, अ‍ॅड.संजय इंगळे, अनिल वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थितांना राहणार आहे. इंजि.ललीत बन्सोड हे पाहुण्याचे स्वागत करतील. भिक्खू संघाची धम्मदेशना, पटाचारा ही नाटीका, विपश्याना वर्ग, अंधश्रध्दा निर्मूलनावर प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि त्यानंतर प्रबोधनपर गीत गायनाने उद्घाटकीय सत्राचा समारोप होईल. ३ फेब्रुवारी रोजी त्रिरत्न वंदना , महिला प्रबोधनपर व युवा मार्गदर्शन पर चर्चासत्र मान्यवरांना धम्मभूषण पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. त्यानंतर समारोपीय सत्रामध्ये महसुलमंत्री ना.संजय राठोड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.माणिकराव ठाकरे , खा.भावना गवळी, जिल्हा परिषद सदस्य राहूल ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर ‘नव्या युगाची सावित्री’ हा एकपात्री प्रयोग कल्याणी गजभिये सादर करणार आहे. या प्रबोधनाचा लाभ घेण्याचे आव्हान आयोजन समिती व भदन्त प्रा.सुमेधबोधी महाथेरो यांनी केले आहे.