विहीरीत दगड कोसळल्याने दोन मजूर ठार

0
9

यवतमाळ , – विहिरीचे खादकाम करीत असताना दगड अंगावर कोसळल्याने दोन मजूर घटनास्थळीच ठार झाले असून एक बालक जखमी झाला. ही घटन दुपारी ३.३० वाजता दरम्यान पिंपळदरी येथे घडली. कांताराव रामराव नाईक (३५), देवबा नागोराव गायकवाड (४५) दोघेही रा. पिंळदरी असे मृतांचे नाव आहे. तर योगेश विठ्ठल तांभारे (१०) हा जखमी झाला.
पिंपळदरी येथील वाडीजवळ मनोहर कांबळे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू आहे. या कामावर दोन्ही कामगार काम करीत होते. दुपार दरम्यान विहिरीच्या वरच्या भागावर असलेला मोठा दगड घसरून अचानक दोन्ही कामगारांच्या अंगावर कोसळला. यामुळे कांताराव नाईक, देवबा गायकवाड यांचा दगडाखाली दबून घटनास्थळीच मृत्यू झाला. सुदैवाने योगेश नामक बालक या अपघातातून बचावला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी जयभीम मनोहर कांबळे यांनी पोफाळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास ठाणेदार सरदार सिंग ठाकूर करीत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.