कवी समाज, निसर्गाचे प्रतिबिंब शब्दात मांडतो

0
18

पवनी,दि.06ः- मी शालेय जीवनापासून कविता लिहायला सुरुवात केली. माझ्या घरी येणार्‍या व साहित्यांची जाण असणार्‍या लोकांना मी माझ्या कविता दाखवित असायचो. त्यांच्याकडून मिळालेल्या शाबासकीमुळे मी आणखी लिहायला प्रेरित झालो. मी कवी म्हणून समाजाचे व निसर्गाचे प्रतिबिंब शब्दात मांडत गेलो. भंडारा येथील प्रसिध्द साहित्यीक कवी, कथाकार, चित्रकार व काष्ठशिल्पकार प्रमोदकुमार अणेराव सांगत होते.
कोंढा येथील गांधी विद्यालय शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाच्या औचित्याने घेण्यात आलेल्या मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. सदर मुलाखत ही ग्रामिण भागातील कवीमनाच्या विद्यार्थ्यांसाठी व नवोदित साहित्यीकांसाठी प्रेरणादायी ठरली.
सदर मुलाखत प्रा. सुरज गोंडाणे व सहाय्यक शिक्षक रतन लांडगे यांनी घेतली. यावेळी दोघांनीही अणेराव यांना त्यांच्या जिवन चरित्रापासून ते साहित्य लेखनाबाबतच्या प्रवासाबद्दल अनेक प्रश्न विचारलेत. व प्रमोदकुमार अणेराव यांनी उत्कृष्ठ व प्रभावीपणे प्रश्नांची उत्तरे दिलीत.
पुढे बोलताना अणेराव यांनी आपल्या जिवनातील अनेक पैलूंना उजाळा दिला. घरची परिस्थिती, शिक्षण, साहित्य, काव्यसंगह, कथासंग्रह, काष्ठशिल्पकला आदीविषयी र्शोत्यांना माहिती सांगितली. अणेराव यांचे विपूल लेखन झाले असून ‘प्रस्तराचे स्वप्नभोग २0१0 ‘ व ‘विरामचिन्हाचा मृत्यू २0१४’ या दोन पुस्तका प्रकाशित झाल्या आहेत. तसेच ‘निर्थकाच्या घनघोर सावल्या (कवितासंग्रह) व ‘विजांच्या तारांतून’ (कथासंग्रह) प्रकाशनाच्या वाटेवर आहे. यावेळी त्यांनी आपल्या कवितासंग्रहातील अनेक कविता वाचून दाखविल्या व र्शोत्यांची मने जिंकलीत.
यावेळी अणेराव यांचा संस्थेचे अध्यक्ष अँड. आनंद जिभकाटे यांचे हस्ते शाल व श्रीफळ तसेच सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील साहित्यिक डॉ. ईश्‍वर नंदपूरे, होते. तर विशेष अतिथी म्हणून डॉ. कल्पना बोरकर नागपूर, साहित्यिक डॉ. अनिल नितनवरे, संस्थेचे उपाध्यक्ष रामदास शहारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.