कोल्हटकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार

0
12

गोंदिया,दि.06ः- जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे महसूल विभागात कार्यरत मंडळ अधिकारी विवेकानंद कोल्हटकर यांचा 30 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. कोल्हटकर यांनी 6 जुलै 1993 रोजी तलाठी म्हणून पदभार संभाडला होता. व 31 डिसेंबर 2017 रोजी ते सेवा निवृत्त झाले.
या सत्कार कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे,अधीक्षक श्री अरमकर,लेखाधिकारी श्री बाविस्कर,ना. तहसीलदार श्री पटले, मडावी,जंगडे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमात श्री कोल्हटकर यांना साल आणि श्रीफळ तथा भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेडेस सत्कारमूर्ती कोल्हटकर सापत्नीक व कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत उपस्थित होते. सेवानिवृत्ती कार्यक्रमात आपले मनोगत मांडतांना कोल्हटकर म्हणाले कि कर्मचारी हा सेवक आहे आणि सेवा त्याचा कर्म, आपल्याला शासनाने सेवेची संधी दिली आणि आपण प्रामाणिक पाने आपले कार्य केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नि.उप.जि. माहिरे म्हणाले कि कोल्हटकर यांनी शासनाला दिलेल्या सेवा आम्ही कधी विसरु शकणार नाही. कामाला कोल्हटकर यांनी चॅलेंज म्हणुन स्वीकारला.
कार्यक्रमात सौ.रेखा विवेकानंद कोल्हटकर,धम्मानंद कोल्हटकर, श्रीमती टेम्भूर्णिकर,दिपाक्षी कोल्हटकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उओअस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन संतोष शेंडे यांनी तर आभार राजन चौबे यांनी केले.