उद्यापासून ‘सर्च शोधग्राम’मध्ये आदिवासी युवा संसद व जत्रा

0
15

गडचिरोली,दि.05 – धानोरा तालुक्यातील सर्च येथे ६, ७ व ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी युवा संसद व मॉ दंतेश्वरी युवा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जवळपास २० वर्षापासून ही जत्रा  भरविल्या जात असून तीन दिवस रंगणाºया या युवा संसद महोत्सवात व्हॉलिबॉल व कबड्डी सामन्यांसोबतच आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी डॉ. अभय व डॉ.राणी बंग आणि हिरामण वरखडे यांच्या हस्ते युवा खेळ स्पर्धाचे उद्घाटन होईल. त्यानंतर व्हॉलीबॉल व कबड्डी सामान्यांना सुरुवात होणार आहे. ४८ गावांच्या सहभागातून गावांमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या १४ गावांमधील १६ संघ सहभागी होणार आहेत. रात्री ८ ते ११ या कालावधीत आदिवासी नृत्य स्पर्धाही घेण्यात येणार  आहेत. बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता यु मुंबा प्रो कबड्डीचे खेळाडू पवन कुमार आणि श्रीकांत जाधव यांच्या उपस्थितीत अंतिम सामने होणार आहेत. सामन्यानंतर आयोजित प्रगट मुलाखतीत हे खेळाडू खेळाविषयीचे स्वत:चे अनुभव सांगून ग्रामीण भागातील युवकांनी खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी कसे परिश्रम घ्यावे याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात ग्रामीण भागातील युवक आणि गावकºयांचे अनुभव व कार्य यावर चर्चा होणार आहे. गावकºयांनी केलेल्या दारुबंदीबाबतही यावेळी चर्चा होणार आहे.

गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता इलाका मांझी प्रमुखांच्या हस्ते मॉ दंतेश्वरी देवीची पूजा आणि माउलीची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर पुजारी कार्यक्रम व खेळांचे बक्षीस वितरण होऊन युवा संसदेचे निर्णय जाहीर करण्यात येईल. त्यानंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता सांगता  करण्यात येईल.