25.1 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home Featured News डॉ.आ.ह.साळुंखे अमृत महोत्सव रविवारला

डॉ.आ.ह.साळुंखे अमृत महोत्सव रविवारला

0
112

नागपूर,दि.10:येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हील लाईन, नागपूर येथे रविवार (दि.१७) सकाळी १०.३० वाजता डॉ. आ.ह.साळुंखे अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सत्कारमुर्ती म्हणून ज्येष्ठ संशोधक व विचारवंत डॉ. आ.ह.साळुंखे उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्षस्थानी माजी आमदार व ज्येष्ठ सत्यशोधक अ‍ॅड. एकनाथराव साळवे व स्वागताध्यक्ष म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकार नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ संशोधक व म.फुले ग्रंथप्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रा.डॉ. हरी नरके, आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा.मा.म. देशमुख, राष्ट्रीय प्रबोधनकार डॉ. सय्यद रफिक गफूर तर भूमिकेत अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉ. अशोक चोपडे, प्रमुख उपस्थितीमध्ये मधुकर मेहकरे, डॉ. सुनील तलवारे, डॉ. त्रिलोक हजारे, रमेश बोरकुटे, नागेश चौधरी, प्रभाकर पावडे, अरqवद पाटील, ऋतायुष, प्रा. जावेद पाशा, विजय बाभुळकर, शैल जेमिनी, प्रा. अरुण पवार, शकीलभाई, हिराचंद बोरकुटे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक बाबा बीडकर व अनुज हुकरे यांनी केले आहे.मुख नितीन शिराळकर यांनी मानले.

blank