स्थानिक निर्मित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करुन द्या-वर्षा पटेल

0
16

गोंदिया ,दि.30ः-ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांमध्ये विविध कला कौशल्य आहे. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होवू शकतात. तसेच त्यांच्या कुटुंबाला सुध्दा हातभार लावण्यास मदत होते. हाख दृष्टिकोन समोर ठेवून संस्कृती मंडळाची अध्यक्षा वर्षाताई पटेल यांनी मागील काही वर्षांपासून मनोहर कॉलनी येथील मैदानात स्वदेशी मीना बाजारास सुरुवात केली आहे. यामुळे स्थानिक महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध आहे.
मनोहर कॉलनी येथील मैदानात गुरुवारपासून या मीना बाजाराला सुरुवात करण्यात आली. यात सिानिक महिलांनी विविध वस्तूंचे ४९ स्टॉल लावले. यात प्रामुख्याने खाद्य पदार्थ, गृह सजावटीच्या वस्तू, दाग-दागिने, हेयर पिन, कोसा सिल्कच्या साड्या, ड्रेस मटेरियल, मेणबत्तीयासह विविध वस्तूंचा समावेश आहे. या सर्व संस्कृती मंडळाच्या महिला सदस्यांनी घरच्या घरी तयार केल्या आहेत. याच वस्तू बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी गेल्यास त्यांची किंमत अधिक आहे. मात्र निर्मिता ते ग्राहक थेट वस्तूंची विक्री केली जात असल्याने ग्राहकांना सुध्दा स्वस्त देशी बनावटीच्या वस्तू उपलब्ध होत आहे.
मंडळाच्या अध्यक्ष वर्षाताई पटेल यांनी मोत्यांपासून तयार केलेली पर्स विशेष आकर्षण होती. वर्षा पटेल यांनी स्वत: प्रत्येक स्टॉलला भेट देऊन महिलांचा उत्साह वाढविला. या संस्कृती मंडळाशी शहरातील ३४0 महिला जुळल्या असून त्यांना या माध्यमातून रोजगार मिळत आहे. मीना बाजारासाठी मंडळाच्या सदस्य बिना पटेल, अनिता पटेल, अमी पटेल, शिल्पा पटेल, निमिषा मेहता, नेहा पटेल, भक्ती पटेल यांनी सहकार्य केले