डॉ.लंजे,डॉ.चौधरी व डॉ.गंजेवारांच्या नेतृत्वात पेसमेकर शत्र्यक्रिया यशस्वी

0
85

गोंदिया,दि.२२ः-येथील राणी अवतींबाई चौक स्थित सहयोग समुहाच्या सहयोग मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात ७० वर्षीय रुग्ण सुखलाल उके यांच्यावर यशस्वीरित्या जिल्ह्यातील पहिली पेसमेकर शत्र्यक्रिया यशस्वी करण्यात आली.ही शत्र्यक्रिया सर्जन डॉ.विवेक लंजे,कार्डियोलॉजिस्ट डॉ.दर्पण चौधरी व डॉ.शैलेंद्र गंजेवार यांच्या चमुने केली.उके यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले तेव्हा त्यांच्या हृदयाची गती संथ व असामान्य असल्याचे आढळून आले.त्यांच्या हृदयाची गती वाढविण्यासाठी शस्त्रक्रिया करुन पेसमेकर या उपकरणाला हृदयात लावायचे होते.त्यासाठी रुग्णाच्या समंतीने शस्त्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले.यात रुग्णालयातील कॅथलॅब टेक्नीशियन,निवासी वैद्यकीय अधिकारी,नर्सिग स्टॉपने सहकार्य केले.