मतदारसंघातील प्रश्नांना घेऊन खा.राणांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा

0
14

नवी दिल्ली,दि.22ः- महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार युवा स्वाभीमानचे अध्यक्ष रवी राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीस्थित शासकीय निवासस्थानी भेट घेऊन मतदारसंघातील समस्या व विकासात्मक मुद्यावर चर्चा केली.अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात सुरक्षा व्यवस्था,भारतामध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची निर्मीती, अचलपूर जिल्हा निर्मीती, अमरावती बेलोरा विमानतळ तातडीने सुरु करणे, चिखलदऱ्याचा महाराष्ट्रातील महाबळेश्वर व माथेरानच्या धर्तीवर विकास करणे, अंध, अपंग, मतिमंद, विधवा निराधार महिला व वृद्धांना केंद्र शासना तर्फे मिळणाऱ्या ६०० रुपये अनुदानावरून २००० रुपये अनुदान करणे, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून शेतकऱ्यांच्या शेती मालाला बाजारभावापेक्षा दीडपट भाव देऊन शासनाने खरेदी करणे, इत्यादी मागण्यांवर चर्चा करुन माहिती दिली.गृहमंत्री शहा यांनीही या मागण्यावर विचार करण्याचे आश्वासन खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना दिले आहे.