मी एक दिवस प्रधानमंत्री झालो तर किंवा लोकसभेचा सभापती, विरोधीपक्षनेता, खासदार झालो तर… अशी विषय निबंध स्पर्धेत आपन बघितली असतील. मात्र खरच जर घडलं तर… अशक्य वाटतं का? मात्र युवक बिरदारी भारत संस्था आणि एबीपी माझा यांच्या वतीने हिस्लॉप कॉलेज नागपुर येथे आयोजित विदर्भ विभाग अभिरूप संसदेच्या माध्यमातून एक दिवस संसदेच्या प्रवासातून आणि सर्व भूमिकांमधुन विद्यार्थ्यांन्ना जाता आलं. अभिरूप युवा संसद म्हणजे लोकशाहीचे मूल्य समजून घेण्यास मदत करणारी आणि सभागृहात नेमकं काय होतं याचं प्रत्यक्ष ज्ञान देणारी ही स्पर्धा होती. विदर्भाच्या विविध जिल्ह्यातून विद्यार्थ्यांच्या चमु याठिकाणी सहभागी झाल्या होत्या. यामध्ये जे. एम. पटेल महाविद्यालय भंडारा येथील “लीडर्स ऑफ़ जे. एम. पटेल कॉलेज” चमुला उत्कृष्ठ पटकथा व संहिता पुरस्कार आणि सहभाग पुरस्कार सन्मान प्राप्त झाले.
अभिरूप युवा संसदेत प्रशांत वाघाये यांनी प्रधानमंत्री ही भूमिका निभावली तर भूमिका पशीने यांनी लोकसभा अध्यक्षांची भूमिका निभावली. विरोधीपक्षनेत्यांची भूमिका विशाल हटवार यांनी बजावली होती आणि शिक्षण विषयक अशासकीय विधेयक सादर केले.
युवक बिरादरी भारत संस्थेचे महासंचालक श्री. आशुतोष शिर्के, विदर्भ विभाग अध्यक्ष विजय लुंगे, सदस्य हेमंत वासू, विद्या लुंगे, प्रा. कडू सर, डॉ. प्रदीप धवणे सर, युवक बिरादरी भारत संस्थेचे नागपूर जिल्हा मुख्य समन्वयक तथा मुख्य आयोजक सचिन वाकुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.
जे. एम्. पटेल महाविद्यालयाच्या चमुमध्ये लोकसभेच्या माननीय सभापतींच्या भूमिकेत भूमिका पशीने होत्या, माननीय प्रधानमंत्री यांच्या भूमिकेत प्रशांत वाघाये होते तर विशाल हटवार विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत होते. चेतना पंचबुद्धे, गायत्री आकरे, मृणाल साकुरे, हर्षिला कुथे हे सत्तापक्षाच्या वतीने मंत्री होते तर पल्लवी भोयर, माधुरी रोडे, अंकिता इश्वरकर, माधुरी कुकवासे, स्वप्नील कुंभारे सत्तापक्षाचे खासदार होते.
विरोधी पक्षाचे कमल साठवणे, साकिब खान पठान, गीतेश्वरी भोंगाडे, पूनम चिचमलकर, शीतल मस्के, प्रिया शेंडे, शुभम टिचकुले खासदार होते. संसदीय सचिव म्हणून लिना ब्राम्हणकर, अभिषेक शर्मा होते. संसदेत प्रधानमंत्री, विरोधीपक्षेनेते सभापतींचे स्वागत करतात. जसा प्रश्नोत्तराचा तास होतो तो तास, त्यानंतर विधेयक मांडण्याची प्रक्रिया, त्यावर सखोल चर्चा आणि त्यादरम्यान सत्तापक्ष आणि विरोधीपक्षाच्या उडणाऱ्या चकमकी असा प्रवास विद्यार्थ्यांनी अनुभवला. मागील वर्षी देखील जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्कृष्ठ सहभाग नोंदवत उत्कृष्ठ सादरीकरण हा समूह पुरस्कार व प्रशांत वाघाये यांनी सर्वोत्कृष्ठ संसदपटू हा पुरस्कार पटकावला होता. विद्यार्थ्यांच्या या यशप्राप्तीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमने, व्यवस्थापनशास्त्र विभागप्रमुख तथा मार्गदर्शक डॉ. प्रशांत मानुसमारे, प्रा. मनीष शेंडे, प्रा. सनी सत्यपाल, प्रा. दिपक भिवगडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
प्रतिक्रिया:
राजकीय क्षेत्रात अभ्यास करत असणाऱ्या किंवा आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना संसदीय कार्यप्रणाली काय असते याची सखोल आणि प्रत्यक्ष माहिती या निमित्ताने भेटली. विशेष म्हणजे एक दिवस माननीय प्रधानमंत्री यांच्या भूमिकेतून मी गेलो. लोकशाही अधिक प्रगल्भपणे समजावी किंबहुना लोकशाहीची मूल्ये युवा पीढ़ीमध्ये रुजावी यासाठी युवक बिरादरी संस्थेच्या वतीने हा सुंदर उपक्रम घेतला गेला. आणि त्याचा मी व माझी चमु भाग होतो याचा निश्चित आनंद आहे. प्रशांत वाघाये ,चमूप्रमुख, जे. एम. पटेल महाविद्यालय भंडारा




