29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home Featured News सालेकसा पंचायत समिती आवारात पुन्हा आढळला अजगर

सालेकसा पंचायत समिती आवारात पुन्हा आढळला अजगर

0
49
सालेकसा,दि.08ः तालुका हा जैवविविधतेने नटलेले असून वेगवेगळ्या दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांचे घर आहे. सालेकसा पंचायत समिती समोरील वसाहतीत टिकाराम टेंभुर्णीकर यांच्या घरी 8 फूट लांबीचा विक्राळ अजगर साप आढळल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.या परिसरात एक तलाव असल्याने त्या तलावाच्या सानिध्यात अजगर निवास करतात.याआधी सुद्धा या ठिकाणी अजगर साप आढळून आले होते. परिसरात असे विशाल साप आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्पमित्र रोहित शेंडे यांनी अजगर सापाला जिवंत पकडून जंगलात सोडून जीवनदान दिले. हा अजगर 8 फूट लांब आणि अंदाजे 25 किलो वजनाचा असल्याची माहिती रोहित शेंडे यांनी दिली.