संख(राजेभक्षर जमादार),दि.08ः-जत शहरापासून काही अंतरावरील तिप्पेहळी गावाच्या हद्दीत असणार्या चव्हाण वस्ती येथील पाझर तलावाच्या पाण्यात बुडून दोन सख्ख्या बहिणीची मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारला(दि.08)घडली.त्या मृत मुलींचे नाव सानिका रामा भिषे व कोमल रामा भिषे अशी आहेत. सानिका चौथीच्या वर्गात तर कोमल पहिल्या वर्गात होती.त्या जतजवळील मानेवस्तीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकत होत्या.आजोबा जेवायला गेल्यानंतर जनावरे घेऊन ठरवण्यास गेल्यानंतर तिथे जवळ असलेल्या पाझर तलावात खेळता-खेळता गेल्याने पाण्यात बुडून पडून बुडाल्याने ही दुर्दैवी घटना घडली.कोमल ही लहान मुलगी खेळता-खेळता पाय घसरून तलावात पडली.तिला वाचवण्याच्या नादात सानीकाही पाण्यात पडून खोलवर असलेल्या पाण्यात गेल्याने आणि दोघेही लहान असल्याने एकमेकांना वाचवण्याच्या नादात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जत मध्ये घडली आहे.




