गोरेगाव,दि.30: आपल्या विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत घेतलेल्या येथील युवा नगराध्यक्षांनी यावेळची दिवाळी ही मिळालेल्या मानधनाच्या पैशातून चंद्रपूरटोलीतील चिमुकल्यासोबंत साजरी करुन नवा संदेश दिला आहे. अंधकारात चाचपडत राहिलेल्या चिमुकल्यांना उजाळा देण्यासाठी नगराध्यक्ष बारेवार यांनी आपल्या मित्रमंडळीना सोबत घेत स्वत:च्या मानधनातून चिमुकल्यांसह दिवाळी साजरी करण्याचा पायंडा कायम ठेवला आहे .समाजाविषयी, अवतीभवती वावरणाºया लोकांविषयी आपुलकी असली की अनेक अभिनव उपक्रम मृर्तरुप घेतात. असाच एक आगळावेगळा अभिनव उपक्रम नगराध्यक्ष बारेवार यांनी राबविला. स्वत:च्या मानधनातील बारा हजार रुपयातून चंद्रपूरटोली येथील चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी केली. सणांचा सर्वात मोठा आनंदोत्सव दिवाळीचा असतो. लख-लख दिव्यांच्या प्रकाशाने पृथ्वीवरीलच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातील अंधकाराचा नायनाट करणारा सण अशी प्रचिती आहे. पण या प्रकाश पर्वातील अनेकांचे काळोखातील जीने सुरुच आहे. त्यावर मात म्हणून बारेवार यांनी गेल्या पाच वर्षापासून एका अभिनव उपक्रमाला हात घातला आहे. चंद्रपूरटोली येथील चारशे कुटुंबातील चिमुकल्यांना फटाके आणि मिठाई वाटून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. दरवर्षी चंद्रपूरटोली येथील निरागस बालके दिवाळीच्या पूर्वसंध्येला बारेवार यांची वाट पाहत एका जागेवर जमा होतात.बारेवार आपल्या मित्रांसोबत जाऊन त्या चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी करतात.या अभिनव उपक्रमाला नगराध्यक्ष आशिष बारेवार, विकास बारेवार, नितीन बारेवार, अनिल राऊत, मोरेश्वर कांबळे, नमन जैन, अमोल भेंडारकर, संजय घासले, भानू हरिणखेडे, शुभम रामटेके, अश्विन रुखमोडे, नितीन कांबळे, अरुण ठाकरे, भालचंद्रत चाचेरे, मलेवार, यश कुण्डजवार, साकेश पालेवार, प्रतिक फाये, टिटू जैन, तरुण पाटील, करण जैन, राजेश सोनवाने या मित्रमंडळीची त्यांना सोबत असते.प्लास्टीक बंदीची अंमलबजावणीचारशे चिमुकल्यांना फटाके व मिठाई देताना कुठेही प्लास्टीकचा वापर न करता कागदी थैलीत सर्व काही दिले जाते.




