गोंदिया,दि.26ः- कोरोनाच्या प्रादुर्भावाने संपुर्ण देशात खळबळ माजली असून येत्या 14 एप्रिलपर्यंत देशात लाॅकडाऊन जाहिर करण्यात आले.त्यामुळे ज्यांच्या डोक्यावर छत नव्हे तर राहण्याची व खाण्याची सोय नाही अशा अनेकांची अडचण होऊ लागली आहे.त्यातच गोंदिया जिल्ह्यातही अशांची संख्या मोठ्याप्रमाणात असून गोंदिया शहरात सामाजिक संस्थासोंबतच शासकीय यंत्रणेनेसुध्दा अशा व्यक्तीसांठी सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यास सुरवात केली आहे.गोंदियातील मनोहर म्युनसीपल हायस्कुलच्या आवारात निराधारांच्या राहण्याची सोय करुन त्यांच्या जेवणाची सोय सुध्दा प्रशासनाने केली आहे.त्यांना लागणार्या सर्व वस्तुंचा पुरवठा करण्यात आलेला आहे.यामध्ये ब्रश,पेस्ट,साबणपासून तर बेडशीटपर्यंतचा समावेश असून चहा नास्ता व जेवणही दिले जात आहे.आज गुरुवारला या निराधारांची भेट घेत व्यवस्थेची पाहणी प्रशिक्षू जिल्हाधिकारी व प्रभारी तहसिलदार रोहन घुगे यांच्यासह उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते व इतर अधिकारी यांनी केली.तसेच गोंदिया शहरात पुरुषोत्तम मोदी यांच्याकडूनही निराधार व गावाला पोचू न शकणार्यांसाठी बसेराची सोय करण्यात आली आहे.नगरसेवक पंकज यादव व कल्लू यादव यांनी जेवणाची सोय केली आहे.





