1 आँक्टोंबरपासून 24 तर 1 नोव्हेंबर पासून 29 नॅरोगेज मार्गावरील गाड्या इतिहासजमा

0
7

खेमेंद्र कटरे
गोंदिया दि.१९- गोंदिया रेल्वेस्थानक हे दक्षिण पुर्व मध्य रेल्वेचे महत्वाचे स्थानक असून गोंदिया बालाघाट हा नॅरोगेज मार्ग ब्राडगेज मध्ये रुपातंरीत होऊन रेल्वेसेवा सुरु झाली.परंतु बालाघाट-जबलपूर दरम्यानच्या मार्गासाठी आता तांत्रिक अडचणी दुर झाल्याने या मार्गावर नैनपूर, नैनपूर ते जबलपूर-मंडलाफोर्ट या नॅरोगेज मार्गाचे ब्राॅडग्रेजमध्ये रुपांतर करण्याच्या कामाला गती येणार आहे.यामुळे रेल्वेला आपल्या उत्पन्नापासूनही काहि वर्ष वंचित राहावे लागणार आहे.
ते येत्या 1 आक्टोबंर पासून.हा मार्ग ब्राडग्रेजमध्ये परावर्तीत झाल्यास गोंदिया जबलपूर-आग्रा -दिल्ली असा नवा मार्ग मिळणार आहे.आता या मार्गावरील नॅरोगेज रेल्वे लाईन जी नागरिकांच्या मनात सतपुडा एक्सप्रेस घर करुन बसली होती.ती आता इतिहास जमा होणार आहे.सोबतच हा रेल्वेमार्ग सुद्दा. तसेच नागपूर-छिंदवाडा, छिंदवाडा-नैनपूर, नैनपूर-मंडलाफोर्ट आणि बालाघाट-नैनपूर-जबलपूर नॅरो गेज सेक्शन 1 ऑक्टोबर 2015 पासून कायमस्वरुपी बंद होणार आहे. छिंदवाडा-नैनपूर, नागपूर-छिंदवाडा आणि नैनपूर मंडलाफोर्ट नॅरो गेज सेक्शन 1 नोव्हेंबर 2015 पासून बंद होणार आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या 53 रेल्वेगाड्या कायमच्या थांबणार असल्याची माहिती दपुम रेल्वेचे विभागीय रेल्वे संचालक अालोक कंसल यांनी दिली.या मंडळातंगर्त फक्त नागपूर-नागभीड सेक्शन स्मॉल गेज ट्रेन लाईन राहिली असून भविष्यात ही सुध्दा ब्राडगेज मध्ये परावर्तीत होणार आहे.

1 ऑक्टोबरपासून बंद होणाऱ्या गाड्या
58839 नागपूर-जबलपूर, 58863 बालाघाट-जबलपूर, 58865 बालाघाट-जबलपूर, 58867 बालाघाट-जबलपूर, 58869 बालाघाट-जबलपूर, 58864 जबलपूर-बालाघाट, 58866 जबलपूर-बालाघाट, 58876 जबलपूर-नैनपुर, 58868 जबलपूर-बालाघाट, 58840 जबलपूर-नागपूर, 58870 जबलपूर-बालाघाट, 58873 बालाघाट-नैनपूर, 58871 बालाघाट-जबलपूर, 58864 जबलपूर-बालाघाट, 58866 जबलपूर-बालाघाट, 58876 जबलपूर-नैनपूर, 58868 जबलपूर-बालाघाट, 58840 जबलपूर-नागपूर, 58870 जबलपूर-बालाघाट, 58874 नैनपूर-बालाघाट, 58858 मंडलाफोर्ट-बालाघाट, 58864 जबलपूर-बालाघाट, 58868 जबलपूर-बालाघाट, 58870 जबलपूर-बालाघाट.

1 नोव्हेंबरपासून या गाड्या होतील बंद
58849 छिंदवाडा-नैनपूर, 58851 छिंदवाडा-नौनपूर, 58853-छिंदवाडा-नैनपूर, 58855 छिंदवाडा-नैनपूर, 58839 नागपूर-जबलपूर, 58840 जबलपूर-नागपूर, 58850 नैनपूर-छिंदवाडा, 58852 नैनपूर-छिंदवाडा, 58854 नैनपूर-छिंदवाडा, 58856 नैनपूर-छिंदवाडा, 58857 नैनपूर-मंडलाफोर्ट, 58859 नैनपूर-मंडलाफोर्ट, 58861 नैनपूर-मंडलाफोर्ट, 58862 मंडाफोर्ट-नैनपूर, 58831 नागपूर-छिंदवाडा, 58833 नागपूर-छिंदवाडा, 58832 छिंदवाडा-नागपूर, 58842 रामकोना-नागपूर, 58862 मंडलाफोर्ट-नैनपूर, 58860 मंडलाफोर्ट-नैनपूर, 58858 मंडलाफोर्ट-बालाघाट, 58839 नागपूर-जबलपूर, 58835 नागपूर-छिंदवाडा, 58841 नागपूर-रामकोना, 58837 नागपूर-छिंदवाडा, 58838 छिंदवाडा-नागपूर, 58836 छिंदवाडा-नागपूर, 58834 छिंदवाडा-नागपूर, 58840 जबलपूर-नागपूर.