सिंचन घोटाळा प्रकरणी तटकरे चौकशीसाठी हजर

0
10

मुंबई दि. २० – : राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरु झाली असून आज लाचलुचपत विभागाच्या मुंबईतील मुख्यालयात सुनील तटकरे चौकशीसाठी हजर झाले.

काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि सुनील तटकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने समन्स बजावले होते. मात्र, दोघेही एसीबीने सांगितलेल्या तारखेला अनुपस्थित राहिले होते. काही दिवसांपूर्वी बाळगंगा धरण घोटाळ्यातील आरोपींना अटक करण्यात आली होती. सुनील तटकरेंनंतर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवारही एसीबीसमोर उपस्थित राहतात का, पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.