औरंगाबादेचे नाव संभाजीनगर झालेच पाहिजे : उद्धव ठाकरे

0
13

मुंबई,दि.२२-आमची बांधिलकी जनतेशी आहे सत्तेशी नाही याचा पुनर्उच्चार करत जनतेची कामं केल्याशिवाय शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे दसरा मेळाव्यात बोलताना म्हणाले. सरकारमधून आम्ही बाहेर कधी पडणार याची इतरांनाच जास्त घाई लागली आहे. तसंच सध्या आम्ही काय बोलतो आहोत याकडे शत्रूंसोबत मित्राचंही लक्ष असल्याचं सांगत भाजपला टोला लगावला.औरंगाबादचं नाव संभाजीनगर झालंच पाहिजे, औरंगजेब महाराजांचं हिंदवी स्वराज्य संपवायला आले.अब्दुल हमीदच्या थडग्यावर नतमस्तक होण्यास तयार, मात्र औरंगजेबाच्या स्मृतीस्थळावर माथा टेकणार नाही.
उध्दव ठाकरेंनी आपल्या संपूर्ण भाषणात हिंदूत्त्वाचा मुद्दा कायम धरून अनेक मुद्यांना हात घालत हिंदुत्त्व आणि मराठीचा आग्रह आम्ही सोडणार नसल्याचं उध्दव म्हणाले. मंदिर वही बनाएंगे लेकीन तारीख नही बताएंगे! असं सांगत उध्दव ठाकरेंनी राम मंदिराच्या घोषणेची खिल्ली उडवली. देशाला हिंदूराष्ट्र म्हणून घोषित करून करून सर्वांना समान नागरी कायदा लागू करा, असंही ते पुढे म्हणाले. डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या करणा-यांना भर चौकात फाशी द्या, परंतु हिंदूंना उगाचच त्रास देऊ नका असा इशाराही त्यांनी दिला.