कोल्हापूरमध्ये सत्तेची चावी आघाडीकडे

0
5
कोल्हापूर, दि. २ – कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसने मुसंडी मारली असून राष्ट्रवादीच्या साथीने काँग्रेस महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.  भाजपा ताराराणी आघाडीने ३२ जागांवर आघाडी घेतली असली तरी सत्तेसाठीची मॅजिक गाठण्यात भाजपाला अपयश आले.
कोल्हापूर महापालिकेतील ८१ जागांसाठी रविवारी मतदान झाले असून तब्बल ६९ टक्के मतदारांनी  मतदानाचा हक्क बजावला आहे. कोल्हापूरमध्ये सुमारे ५०७ मतदार निवडणुकीच्या रिंगणात होते. कोल्हापूरमध्ये ८१ पैकी काँग्रेसने २७ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपा – ताराराणी आघाडी ३२, राष्ट्रवादी काँग्रेस १५, शिवसेना ४ व अन्य पक्ष ३ जागेवर आघाडीवर आहे.