मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला दोन जागा?

0
12

मुंबई दि. १0-– बिहार विधानसभा निवडणुकीत जोरदार पराभवाचा धक्‍का बसलेल्या भाजपने सरकारमध्ये सहभागी असतानाही सातत्याने पक्षाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला आगामी राज्य मंत्रिमंडळ विस्तारात दोन जागा देऊन विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती सूत्रांनी  दिली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याची माहिती दिली. दिवाळीनिमित्त पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते म्हणाले, “”मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे.  सूत्रांनुसार शिवसेनेला या विस्तारात दोन जागा देण्यात येतील. या जागांसाठी गुलाबराव पाटील आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा विचार केला जाण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रात भाजपला साथ देणाऱ्या महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला; तसेच राजू शेट्टी यांच्या एका सहकाऱ्याला शपथ दिली जाईल. पश्‍चिम महाराष्ट्रातील शिवाजीराव नाईक किंवा सुरेश खाडे, विदर्भातून चैनसुख संचेती किंवा भाऊसाहेब फुंडकर किंवा डॉ. संजय कुटे, मराठवाड्यातून संभाजी पाटील निलंगेकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्‍यता आहे.