भुजबळांची १६० कोटींची जमीन ईडीच्या ताब्यात

0
4

मुंबई दि.१५: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज आणि पुतणे समीर हे संचालक असलेल्या हेक्स वर्ल्ड या कंपनीच्या १६० कोटींच्या खारघरस्थित जमिनीवर सक्तवसुली संचानालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी टाच आणली. हा भुजबळांना जबर हादरा मानला जात आहे.

देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रवर्तक असलेल्या या जमिनीची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार १६० कोटींच्या घरात जाते, असे ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. ७१ कोटी रुपयांत खरेदी केलेल्या या जमिनीवर हेक्स वर्ल्डचा गृहप्रकल्प उभारण्यात येणार होता. यासाठी पैैसा कसा आला, याचा छडा लावण्यात आला असून मुंबई आणि इतर ठिकाणीही, लवकरच अशा प्रकारची जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.