कुंभकर्णी नेत्यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेस छत्तीसगडला पळविली

0
9

खासदारांना माहितीच नाही,तर माजी मंत्री पराभवाचा वचका काढण्यातच मशगुल
जनतेत आक्रोश
१ डिसेंबरपासून महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदियाएैवजी धावणार दुर्ग रेल्वेस्थानकातून

जनताही निद्रिस्त होऊन मग्न,राजकीय पक्ष झोपेतच
गोंदिया-गेल्या काही दशकापुर्वी महाराष्ट्र एक्सप्रेस हे नाव सार्थक करण्याच्या उद्देशाने नागपूरपासून धावणारी नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेस गोंदियापर्यंत वाढविण्यात आली.१९९६ च्या जवळपास गोंदियावरुन सुरु झालेली ही महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे दोन दशकानंतर महाराष्ट्रातूनच चक्क पळविण्याचा डाव रचण्यात आला असून ही गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे आत्ता छत्तीसगड राज्यातील दुर्ग रेल्वेस्थानकावरुन सोडण्याचा निर्णय रेल्वेमंत्रालयाने घेतल्याने गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील खासदार ,आमदारांसह सर्वच लोकप्रतिनिधी कुंभकर्णी झोपेत आहेत.त्यांना या रेल्वेशी काही देण घेण राहिले नाही.विशेष म्हणजे माजी मंत्री व जिल्ह्याच्या विकासाचे गोडवे गाणरे विद्यमान राज्यसभा सदस्य हे तर याप्रकरणी मजा घेत बसल्याचा आरोप काही जनता करु लागली आहे.तर वि्द्यमान खासदार स्पेशल अपयशी पडल्याचेही बोलले जात आहे.जेवढा लोकप्रतिनिधींचा दोष तेवढा या गोंदिया जिल्ह्यातील नव्हे तर शहरातील निद्रिस्त जनतेचा दोष आहे जे फक्त चुकीच्या कारणासाठी आक्रोश करीत गुन्हेगारांसाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा वापरतात ते मात्र  या लोकोपयोगी रेल्वेसाठी गप्प बसले कारण हे महाराष्ट्रीय जनता नसल्याचा फटका आत्ता बसू लागला आहे.हिंदी भाषिकच्या नावावर गोंदियात जे चालले त्याचा परिणाम मराठी भाषिक जनतेला या महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वेच्या नावाने बसला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुध्दा गप्प बसली तर शिवसेना हय्यातच नसल्यासाराखी आहे .तर भाजपची मोदी समोर बोलण्याची हिंमतच राहिली नाही.आणि काँग्रेस ही शंकरगल्लीपुरतीच राहिली तर राष्ट्रवादी फक्त निवडणुकीपुरतीच जिल्ह्यात तर उर्वरित काळात दिल्लीत गडकरी सोबत बसून जिल्ह्याच्या विकासात अडथळा घालण्यातच व्यस्त असल्याची टिका आज महाराष्ट्र एक्सप्रेसच्या माध्यमातून जनता करीत असल्याचे विदारक चित्र बघावयसा मिळत आहे.
गोंदिया रेल्वेस्थानकातून सुटणारी गोंदिया कोल्हापूर गाडी क्र.११०४० ही येत्या १ डिसेंबरपासून छ्त्तीसगड राज्यातील दुर्ग रेल्वेस्थानकातून अधिकृत घोषणा व्हायला असली तरी यासंबधीच्या वृत्तामुळे छत्तीसगडमध्ये रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या जाहिर अभिनंदनच्या जाहिराती वृतपत्रात झळकूू लागल्या आहेत.
१९९२ ला सुरु झालेली ही रेल्वे दक्षिण पुर्व मध्य रेल्वे विभागातर्गंत येत ६६ स्थानकावर ही गाडी थांबते.रेल्वे मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दुर्ग रेल्वे जंक्शनवरुन ही गाडी सकाळी ६ वाजता सुटणार आहे.त्यामुळे गोंदियावरुन सरळ नागपूरसाठी सकाळी असलेली ही एकमेव रेल्वे गाडी सुध्दा हिरावून घेण्यात आल्याने मोठा जनाक्रोश दिसून येत आहे.
गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांनी या निर्णयाचा निषेध नोंदविला असून महाराष्ट्र एक्सप्रेस ही महाराष्ट्राला जोडणारी रेल्वे असल्याने ती छत्तीसगडला दिल्यास विरोध करण्याचा इशारा दिला आहे.

खासदार म्हणतात अद्याप निर्णय नाही
महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे गोंदियापासून हिरावून घेतली गेली असून १ डिसेंबरपासून ती छत्तीसगडच्या दुर्ग स्थानकातून सोडण्याचा निर्णय रेल्वेमंत्रालयाने घेतल्याबद्दल भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांना विचारणा केली असता त्यांनी मात्र असा निर्णय झाला नसल्याचे सांगितले.यावरुन खासदार पटोलेंना रेल्वे मंडळाने ही गाडी गोंदियातून हिरावून घेतल्यानंतरही माहिती नसल्याने जनतेत खासदाराच्या भूमिकेवर सुधद प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.