पोलिस पाटील भरती रद्द करा

0
19

पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर अन्यायग्रस्तांचे उपोषण

देवरी, ता. 6 : देवरी, सालेकसा आणि आमगाव तालुक्यातील पोलिस पाटील भरतीत भ्रष्टाचार झाला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या सडक अर्जुनी येथील निवासस्थानी अन्यायग्रस्त उमेदवारांनी रविवारपासून (ता. ६) बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. दरम्यान, देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार यांंच्यासह पालकमंत्री बडोले यांनी या गैरव्यवहाराला जबाबदार असलेले देवरीचे उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्या निलंबनाची मागणी खुद्द मुख्यमंत्र्यांकडे केली होती, हे येथे विशेष.