मजीप्रा आंदोलकांच्या मागण्या अधिवेशनातच सोडवू मुख्यमंत्री

0
8

नागपूर/गोदिया दि.9- महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला शासनात नियमित सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी अधिकारी व कर्मचार्‍यांनी सोमवारपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन दुसर्‍याही दिवशी सुरू होते. त्यामुळे गोंदिया शहरासह राज्यातील जनतेला चांगलाच फटका बसला.या आंदोलनाची तीर्वता बघून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री लोणीकर यांच्यासह राजेशकुमार,अधिक्षक अभियंता हेमंत लांडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.मजीप्रा अधिकारी कर्मचारी संघर्ष समितीच्या पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना आपली बाजू सांगितल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याच अधिवेशन काळात मागण्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.तसेच अर्थविभागाकडे असलेले प्रलबित प्रश्न सोडविण्यासोबतच पेंशनसह सर्व प्रश्न कॅबीनेटच्या नोटमध्ये घेणय्ाचे निर्देश दिले.यावेळी मंत्रीसह विभागाचे सचिव,मजीप्राचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.नागपूरात सुरु असलेल्या आंदोलन मंडपाला मंत्री लोणीकर यांनी भेट देऊन सर्व मागण्या मान्य करण्याचे तसेच अधिवेशन काळातच निर्णय घेण्याचे मुख्यमंत्री यांनी मान्य केल्याचे आंदोलन कर्ते अधिकारी कर्मचारी यांना निरोप दिला. 
अचानक पुकारलेल्या या काम बंद आंदोलनामुळे शहरातील नागरिकांची चांगलीच फजिती झाली. कुठलीही पूर्वसूचना नसल्यामुळे नागरिकांना नळाला पाणी येणार नाही याची माहिती नव्हती. त्यामुळे नागरिकांना बकेट्स घेऊन हातपंपांवर धाव घ्यावी लागली. सोमवारनंतर मंगळवारीही ही स्थिती कायम होती.मुख्यमंत्री आपले आश्वसन पुर्ण करतात काय याकडे लक्ष लागले असून आज संघर्ष समिती आंदोलनावर चर्चा करुन आंदोलन मागे घेते की निर्णय होत पर्यंत सुरु ठेवते यावर लक्ष लागले आहे