विधानपरिषद निवडणुकीसाठी कॉंंग्रेस-भाजपचे उमेदवारी अर्ज दाखल

0
6

नागपूर ,दि.9-विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज, बुधवार शेवटचा होता. त्यामुळे आज भाजप आणि कॉंग्रेसमधून उमेदवारी अर्ज कोण दाखल करणार याकडे राजकीय क्षेत्रात सर्वांचे लक्ष लागले होते.भाजप कडून उमेदवारी अर्ज गिरीष व्यास यांनी तर कॉंग्रेस मधून अशोकसिंग चौहान यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजप-कॉंग्रेस मधून कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार या चर्चेला आज पूर्ण विराम मिळाला आहे.वि्द्यमान आमदार राजेंद्र मुळक यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली तर भाजपने मानकर सारखे मातब्बर डावलत व्यास यांना संघाच्या दबावात उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.