दत्ता पडसलगीकर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी

0
8

मुंबई- मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी ज्येष्ठ पोलिस अधिकारी दत्ता पडसलगीकर यांची वर्णी लागली असून, शनिवारी ते विद्यमान आयुक्त जावेद अहमद यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. जावेद अहमद  सेवानिवृत्त होत आहेत. असे असले तरी जावेद यांची सोदी अरेबियात भारताच्या राजदूतपदी निवड झाली आहे. जावेद यांचा पोलिस आयुक्तपदाचा कार्यकाल 31 जानेवारी रोजी संपत आहे. मात्र, त्यादिवशी रविवार आल्याने शनिवारीच ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळेच शनिवारी दुपारीच जावेद यांच्याकडून पडसलगीकर आयुक्तपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.