राज्य सरकारी-निमसरकारी- शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे कडून “राज्यव्यापी बाईक रॅलीचे” आयोजन

0
156

गोंदिया,दि.10ः अंशदायी पेन्शन योजना एनपीएस रद्द करून सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करा
महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना 21 ऑगस्ट 2022 रोजी नाशिक येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची राज्य कार्यकारणी सभा पार पडली. या सभेत राज्यातील सरकारी- निमसरकारी – शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यात यावी. या मागणीबाबत अत्यंत महत्वपूर्ण चर्चा झाली. महाराष्ट्र शासन या मागणीबाबत अत्यंत उदासीनतेने कार्यवाहीची पावले उचलताना दिसून येत आहे.
कर्मचाऱ्यांचे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एनपीएस बाबत विचारविनिमय करून योग्य निर्णय घेण्यासाठी शासनाने सकारात्मक विचार करून अर्थ राज्यमंत्र्यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 21 जानेवारी 2019 रोजी अभ्यास समितीची स्थापना केली. या समितीच्या दोन किंवा तीन बैठका संपन्न झाल्या. परंतु मागील साडेतीन वर्षांचा कालावधी लोटून सुद्धा राज्यातील एनपीएस धोरणा संदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे राज्यातील कर्मचारी शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष आहे.
केंद्र शासनाचे वाक्यातील सेना दलाला जुनी पेन्शन योजनाच कायम ठेवण्यात आली आहे. खासदार आमदार यांना आजही नवीन यांचेदायी पेन्शन योजना लागू झालेली नाही. यावरून नवीन पेन्शन योजना कर्मचाऱ्यांचे हिताची नाही हे ध्वनीत होते. दुसरे असे की एनपीएस योजनेमार्फत मिळणाऱ्या संभव पेन्शन योजनेचे लाभाचे स्वरूप कोणतीही शाश्वती न देणारे आहे. कारण फंड मॅनेजरला पेन्शनच्या जमा रकमेतून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची मुभा आहे.
सामाजिक सुरक्षेसाठी नवीन अनंतदाय पेन्शन योजना रद्द करून जुनी परिभाषित पंचवटी योजना सर्वांना लागू करण्याची हिताची आहे, अशी सर्व कर्मचारी शिक्षकांची पक्केधारणा आहे. अलीकडेच राजस्थान छत्तीसगड गोवा झारखंड या राज्यांनी तेथील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. त्यामुळे वरील राज्य प्रमाणे एनपीएस बाबतचे सुधारित धोरण महाराष्ट्र राज्यात लागू केले जाईल असा विश्वास कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
त्या अनुषंगाने राज्यातील तरुण एनपीएस धारक कर्मचारी बुधवार दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी राज्यव्यापी बाईक रॅली काढणार आहेत.गोंदिया जिल्ह्यात देखील सदरील बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सदरील बाईक रॅली ही नवीन प्रशासकीय इमारत डाॅ.आँबेडकर चौक गोंदिया येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचेल व तिथे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांचे नावे निवेदन देण्यात येईल.
सदर विषयाला अनुसरून, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा गोंदिया तथा सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीची महत्वाची सभा दिनांक 10 सप्टेंबर 2022 शनिवारला दुपारी 2 दोन वाजता मध्यवर्ती संघटनेचे कार्यालय नविन प्रशासकीय इमारत तळ मजला जयसतंभ चौक गोंदिया येथे आयोजित करण्यात आली होती.या सभेत जुनी पेंशन मिळण्याबाबत दि.21 /9/2022 रोजी महाराष्ट्र भर बाईक रॅली काढण्याबाबत सोबतच इतर मागण्या बाबत चर्चा करण्यात आली. तसेच आगामी काळात मोठे आंदोलन दि.6 नोव्हेंबर, 2022 ला मुंबई येथे संघटनेचा ऐतिहासिक हिरक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या आयोजनात राज्यातील व देशातील कर्मचारी कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, याविषयी माहीती देण्यात आली.सभेला सर्व संवर्ग संघटनांचे अध्यक्ष /सचिव, पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हा समन्वय समितीचे सर्व संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित गुप्त बाईक रॅलीमध्ये सर्व प्रवर्ग संघटनांनी सहभागी व्हावे असे जाहीर आव्हान करण्यात आले. सदर सभेमध्ये लिलाधर पाथोडे सरचिटणीस तथा निमंत्रक गोंदिया जिल्हा समन्वय समिती, आशिष प्र. रामटेके जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना गोंदिया तसेच सहसचिव, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, प्रकाश ब्राह्मणकर राज्य उपाध्यक्ष शिक्षक भारती संघटना, राजेंद्रकुमार कडव जिल्हाध्यक्ष, जुनी पेन्शन संघटना, एन. के. भालेराव राज्य सम्वयक राज्य आरोग्य कर्मचारी संघटना महाराष्ट्र,समीक्षा चीखलकर कोषाध्यक्ष, महाराष्ट्र अभिलेखापाल कर्मचारी संघटना,मीनाक्षी बिसेन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना जिल्हा गोंदिया,चंद्रशेखर वैद्य बाघ इतियाडोह पाटबंधारे संघटना जिल्हा गोंदिया, नितेश बांते जिल्हासचिव, सिंचन कर्मचारी संघटना जिल्हा गोंदिया,रमेश नामपल्लीवार उपाध्यक्ष मध्यवर्ती संघटना,खुषरांग नागफासे कोषाध्यक्ष मध्यवर्ती संघटना हजर होते.