सिंधुदुर्गातील अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश करणार

0
9

👉🔴👉नूतन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिले आश्वासन

सिंधुदुर्ग:-सिंधुदुर्गात सध्या अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले असून याची मोठी वाहतूकही जिल्ह्यातून होते. सध्याची तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत असून याला कुठे तरी ब्रेक लागणे महत्वाचे आहे. गांजा, चरस यांची विक्री छुप्या पद्धतीने होत असून यावर अंकुश आणण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनाने पाऊले उचलणे आवश्यक असल्याची भूमिका जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर, उपाध्यक्ष समिल जळवी, सचिव शिरीष नाईक, सदस्य मिलिंद धुरी, आनंद कांडरकर या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.

👉🔴👉तसेच सिंधुदुर्गात परराज्यातील (केरळीयन) काही व्यावसायिकही शेती करण्याच्या नावाखाली जमीन भाडेतत्वावर घेतात आणि तेथे अमली पदार्थ शेती करतात. यामुळे अमली पदार्थांचा विळखा वाढला आहे. याकडे सुद्धा लक्ष वेधण्यात आले. याबाबत नवे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी आश्वासन देताना पोलीस प्रशासन याबाबत सतर्क असून या अमली पदार्थ तस्करी असो वा त्यांच्या वाहतुकीचा बिमोड करण्यात येईल, असे आश्वासन अग्रवाल यांनी दिले.