अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

0
16
  • पोलिसांच्या घरांसाठी 320 कोटींची तरतूद
  • ग्रामीण आरोग्यासाठी 230 कोटी रुपयांची तरतूद
  • स्वातंत्र्य सैनिकांना घर बांधणीसाठी मदत देणार 
  • निसर्ग व वनपर्यटनासाठी 36 कोटींची तरतूद
  • सहा व्याघ्र प्रकल्पांजवळील गावांच्या पुनर्वसनासाठी 200 कोटींची तरतूद
  • चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी नमानी चंद्रभागा योजना, त्यासाठी 20 कोटींची तरतूद
  • राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये CCTV प्रकल्पांसाठी 300 कोटींची तरतूद
  • ‘माझी कन्या भाग्यश्री‘ योजनेसाठी 25 कोटींची तरतूद

चंद्रपूर शहराच्या विकासासाठी म्हाडाची स्थापना.

मेटो-३ साठी ९० कोटींची तरतूद.

कल्याण-भिवंडी-शिळफाटा उन्नत मार्गासाठी ४० कोटींची तरतूद.

कडधान्य आणि तेलबीयांसाठी ८० कोटींची तरतूद.

कृषीप्रक्रिया उद्योग उभारणाऱ्याला २५ टक्के किंवा ५० लाखांपर्यंत अनुदान,

गोवंश रक्षा केंद्रासाठी ३४ कोटींची तरतुद, कुकुटपालना सारख्या कृषी संबंधित व्यवसासायासाठी ५१ कोटींची तरतुद.

अकोला आणि जळगाव जिल्ह्यात दोन पशूवैद्यकीय विद्यालयांचा प्रस्ताव.

अकोला, कराड, चंद्रपूर, शिर्डी विमानतळांचा विकास करणार,

२०२२ पर्यंत सर्वांना घरे, त्यासाठी ७०० कोटींची तरतूद.

३ हजार ९२४ किमीचे नवीन राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित.

जलसिंचनासाठी ७ हजार ८५० कोटींची तरतूद.

वीज वितरणासाठी ३०१ कोटींची तरतूद.

ऊर्जा निर्मितीसाठी ५८४ कोटींची तरतुद.ग्रामीण पेयजल योजनेसाठी १७० कोटींची तरतूद – सुधीर मुनगंटीवार

राज्यातील नऊ रेल्वेप्रकल्पांसाठी ६८ कोटी ६० लाखांची तरतूद.

वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी २६५ कोटींची तरतुद,

वीज दरातील सवलतींसाठी १ हजार कोटींची तरतुद,

२१ हजार किमीचे रस्ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधणार,

रस्ते बांधणीसाठी ४ हजार ५० कोटींची तरतुद.जलसिंचनासाठी ७८५० कोटींची तरतुद,

प्रत्येक जिल्ह्यात सक्षम हवामान केंद्र उभारणार, राज्यातील सात प्रकल्पांचा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश,

नाबार्डच्या सहाय्याने नवीन दुग्धउत्पादन केंद्र विकसित करणार.

राज्य महामार्गावर दर १०० किमी अंतरावर एक असे ४०० स्वच्छतागृह बांधणार.