स्व. अरखराव यांना ग्रामसेवक संघटनेची श्रद्धांजली

0
9

देवरी येथील पंचायत समितीच्या सभागृहात ग्रामसेवक स्व. रवींद्र अऱखराव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सभापती मरई. उपसभापती भेलावे, गटविकास अधिकारी मेश्राम, सहायक गटविकास अधिकारी एस एस पांडे आदी मान्यवर

 

देवरी, ता 18- देवरी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले कन्हालगावचे ग्रामसेवक रवींद्र भिमराव अरखराव यांच्या स्थानिक तहसील कार्यालयासमोर अपघाती निधन झाले होते. स्व. अरखराव यांना स्थानिक पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचाऱी तथा ग्रामसेवक युनिअन शाखा देवरीच्या वतीने आज (ता.18) श्रद्धांजली वाहण्यात आली.

पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित  या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी देवरीचे गटविकास अधिकारी शालिकराम मेश्राम हे होते. यावेळी सभापती देवकी मरई, उपसभापती संगीता भेलावे, सदस्य अर्चना ताराम, सुनंदा बहेकार,सहायक गटविकास अधिकारी एस एम पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. स्व. अरखराव यांचे गेल्या गंगळवारी (ता15) अपघाती निधन झाले होते. ते बॅंकेतून आपले काम आटोपून तहसील कार्यालयाच्या दिशेने जात असताना राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या दुचाकीला पिकअपने जोरदार धडक दिली होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. अरखराव याच्या प्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. ते आपल्या कामात अत्यंत प्रामाणिक आणि वक्तशीर असल्याच्या उल्लेख सदस्या अर्चना ताराम यांनी केला. सभापती मरई यांनी प्रत्येत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागे कुटुंब आहे याची जाण ठेवूनच आपले वर्तन
ठेवण्याची विनंतीपर उपदेश दिला. त्या म्हणाल्या की, जेव्हा आपल्या घरातून कर्ता अशा प्रकारे निघून जातो, तेव्हा त्या घरातील सदस्यांना काय त्रास होतो, याची जाण मलाआहे. त्यामुळे आपल्या कामात वक्तशीरपणा आणि शिस्त ठेवून तणावाखाली प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी  बोलताना केले. यावेळी मान्यवरांनी अऱखराव यांना श्रद्धाजली वाहत त्यांच्या कंटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष विनोद श्रीवास्तव यांनी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर मानसिक तणाव येणार नाही, याची काळजी घेण्याची विनंती केली, कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांकडून अनावश्यक मानसिक दडपण आणले जाते. यातून एखाद्याच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होऊन एखाद्या कुटुंबाची वाताहत होण्याची शक्यता असते.

या शोकसभेला पंचायसमिती कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामसेवक संघटनेते सर्व पदाधिकारी आणि ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते,