महाराष्ट्रभर सभा घेणार- कन्हैया कुमार

0
17
पुणे- मी लवकरच पुण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात मी संपूर्ण महाराष्ट्राभर फिरून सभा घेणार आहे. माझा एफटीआयआय, फर्ग्यूसन व रानडेमधील विद्यार्थ्यांना पाठिंबा आहे. जे जे विद्यार्थी आंदोलन करतील त्यांच्या त्यांच्या आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी मी जाणार आहे अशी माहिती कन्हैया कुमार याने दिली आहे. तसेच आपण भाजयुमो किंवा आभविपच्या धमक्यांना भीक घालत नाही असेही कन्हैयाने म्हटले आहे.
पुण्यातील काही कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येत संयुक्त विचार मंचाची स्थापना केली आहे. या विचार मंचाने रविवारी पत्रकार परिषद घेत कन्हैयाकुमारला आम्ही पुण्यात बोलवणारच अशी घोषणा केली होती. आम्ही कन्हैयाच्या संपर्कात आहे असेही या विद्यार्थ्यांनी सांगितले होते. आज त्याला खुद्द कन्हैया कुमारने पुष्टी दिली आहे. या विद्यार्थ्यांसोबतच युवक क्रांती दलाचे (युक्रांद) अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनीही गांधी भवन येथे कन्हैयाकुमारची सभा व तरूणासोबत संवादाचा कार्यक्रम घेणार असल्याचे जाहीर केले आहे.