30 कोटींची लाच मागितली, खडसेंचा स्वयंघोषित स्वीय सहायक अटकेत

0
8
मुंबई – महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा खासगी पीए अशी स्वत:ची ओळख सांगणाऱ्या गजानन पाटील यास जमीन हस्तांतरासाठी तीस कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी मंत्रालयात अटक केली. मात्र पाटील ही व्यक्ती आपल्या कार्यालयात कोणत्याही पदावर कार्यरत नसल्याचा आणि पाटील यांना आपण ओळखतही नसल्याचा दावा खडसे यांनी केला आहे.
खडसेंच्या बंगल्यावर या कामासाठी पाटील यांनी अनेकदा बैठका घेतल्या होत्या. त्याचे व्हिडिओ चित्रीकरणही उपलब्ध असल्याचा तक्रारदारांचा दावा अाहे. मात्र, एफअायअारमध्ये बंगल्यावरील बैठकीची नाेंद नाही. ठाणे जिल्ह्यातील मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थेला जमीन हस्तांतरित करण्याकामी पाटील यांने संस्थेच्या विश्वस्तांकडे तब्बल ३० कोटींची लाच मागितली होती. गजानन लक्ष्मण पाटील हे मेळ सागवे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव येथील रहिवासी आहेत. लाचलुचपत खात्यातील पोलिस निरीक्षक संदीप वेदपाठक यांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला असून यात महसूलमंत्री खडसे यांच्याकडील काम करवून देण्यासाठी पाटील हा लाच मागत असल्याचे म्हटले आहे.
लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून पाटील लाच मागत असल्याचे पंचासमक्ष नोंद केली. खडसे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात आिण रामटेक या बंगल्यावरही लाचलुचपत प्रतिबंधक िवभागाने लाच प्रकरणाची अनेकदा पडताळणी करुन खात्री केली. त्यानंतर पाटील याने लाचेची रक्कम वाढवत १५ कोटी केली. ५ मे रोजी लाचलुचपत िवभागाने जेव्हा शेवटची पडताळणी केली, तेव्हा पाटील याने संस्थेस जमीन नावावर करण्यासाठी ३० कोटीची मागणी केली. रक्कम िदल्यास नाथाभाऊ म्हणजे एकनाथ खडसे यांच्याबरोबर बैठक लावतो, असेही अाश्वासन िदले. त्याचे हे सर्व बोलणे आिण खाणाखुणा लाचलुचपतच्या अिधकाऱ्यांनी कॅमेरा रेकाॅर्ड केले आहे,असे जाधव यांनी सांगितले. लाच मागणीची खात्री पटल्यानंतर १५४ अन्वये सोमवारी ९ मे रोजी गजानन पाटील याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र गुन्हा नाेंद होऊनही आिण लाच प्रकरणाचे पुरावे असूनही पाटील यास पाच िदवस अटक केली नव्हती. अखेर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मंत्रालयाच्या गार्डन गेटजवळ पाटील याला ताब्यात घेण्यात आले.