खडसेंकडून MIDC च्या जमिनीची पत्नी, जावयाच्या नावावर खरेदी

0
13

पुणे,दि. 23 – राज्याचे महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी भोसरी एमआयडीसीने संपादित केलेली ४० कोटी रूपयांची ३ एकर जागा पत्नी व जावयाच्या नावाने खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी याबाबतची कागदपत्रे उजेडात आणून खडसे यांनी बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचे सबळ पुरावे सोमवारी सादर केले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळया कारणांनी वादाच्या भोवºयात अडकलेले एकनाथ खडसे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.

हेमंत गावंडे यांनी मंदाकिनी खडसे व गिरीश चौधरी यांनी अब्बास उकानी यांच्यासमवेत २८ एप्रिल रोजी केलेले खरेदीखत, मुद्रांकशुल्क जमा केल्याची पावती, मंदाकिनी खडसे व गिरीश चौधरी यांच्या सहया व अंगठयाचे ठसे, एमआयडीच्या नावाने असलेला सातबारा उतारा, उच्च न्यायालयातील याचिका आदी कागदपत्रे पुराव्या दाखल सादर केली आहेत.