मुख्यमंत्र्यांचा ‘अडसर’ दूर

0
9
गोंदिया- भाजपने राज्यात जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत यश संपादन केले तेव्हापासून सत्तेस्थानी कुणी राहावे यासाठी भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच होती.स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बहुजन चेहरा आणि वरिष्ठ नेते म्हणून एकनाथ खडसे यांची मुख्यमंत्री होण्याची तयारी होती.परंतु त्यांना डावलून देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली.तेव्हापासून खडसे हे नाराज होते त्यांनी अनेकदा तशी नाराजी जाहिरपणे व्यक्त केली होती ती नाराजी कुठेतरी मुख्यमंत्र्यांना अडसर होती.ती अडसर मात्र खडसेवर लागलेल्या आरोपामुळे दूर झाल्याचे चित्र आहे.
ज्येष्ठतेचा निकष डावलून भाजपने राज्यात फडणवीसांना मुख्यमंत्रिपदी बसवल्याने खडसे नाराज होते. तसेच भविष्यात राज्यात नेतृत्व बदलण्याची वेळ आल्यास पंकजा मुंडे, तावडे व खडसे हे फडणवीस यांचे स्पर्धक मानले जात होते. यात खडसे हे सर्वाधिक बडे स्पर्धक होते. त्यातच खडसेंची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिली नव्हती. आपणच खरे सुपर सीएम आहोत अशा थाटात खडसे वावरत असत. त्यामुळे फडणवीस यांनी खडसेंच्या कामावर बारकाईने ‘लक्ष्य’ ठेवले. तसेच पंकजा, तावडे व खडसे यांच्याविरोधात माहिती बाहेर पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली. आता खडसेंची खुर्ची गेल्याने फडणवीसांच्या मार्गातील अडथळे पुढील साडेतीन वर्षे तरी दूर झाल्याचे मानले जात आहे.