खडसेंना लोकायुक्तांची “क्‍लीन चीट’

0
10

पीटीआय
मुंबई – महाराष्ट्राचे लोकायुक्त निवृत्त न्यायाधीश एम. एल. तहलियानी यांनी राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना त्यांचे स्वीय सहायक गजानन पाटील याच्या लाचमागणी प्रकरणात “क्‍लीन चीट‘ देत या प्रकरणाची फाइल बंद करण्याचे आदेश दिले.

मंत्रालयाच्या आवारात 30 कोटींची लाच मागितल्याप्रकरणी भ्रष्टाचारविरोधी पथकाने खडसे यांचे स्वीय सहायक गजानन पाटील यांना अटक केली होती. या प्रकरणासहित भोसरी येथील एमआयडीसीचा प्लॉट खरेदी प्रकरणामध्ये खडसे अडकल्याने त्यांना आपल्या महसूल मंत्रिपदासह 12 खात्यांचा राजीनामा द्यावा लागला होता.

या प्रकरणातील तक्रारदार व भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी 27 मे रोजी लोकायुक्तांपुढे आपली बाजू मांडली होती. त्यानंतर आज लोकायुक्तांनी खडसे यांना “क्‍लीन चीट‘ देत या प्रकरणाच्या फाइल बंद करण्याचे आदेश दिले.