पुर्व विदर्भातील नगरपंचायतींना आकृतीबंध मंजूर

0
11

गोंदिया,दि.07-राज्यात १३५ तालुका मुख्यालयी ग्राम पंचायतऐवजी ‘क’ वर्ग नगर पंचायती २0१५ मध्ये स्थापित करण्यात आल्यात, यापैकी १0१ नगरपंचायतींमध्ये आकृतीबंधान्वये पदनिर्मिती करण्याचा निर्णय नगर विभागाने मंगळवारी घेतला. यामध्ये पूर्वीच्या ग्रामपंचायतींमध्ये नियमित स्वरुपात कामावर असलेल्या कर्मचार्‍यांना समावून घेण्यात येणार आहे. तसेच नगर पंचायतीच्या लोकसंख्येच्या आधारे पदनिर्मिती करण्यात येणार आहे.यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील नगरपंचायतीचा समावेश केल्याबद्दल आमदार विजय रहांगडाले,आमदार संजय पुराम,भाजप जिल्हा अध्यक्ष हेमंत पटले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.
विभागीय क्षेत्रातील नगर परिषदा व नगर पंचायतीमध्ये मंजूर आकृतीबंधाने अधिक असलेल्या व अतिरिक्त ठरलेल्या अर्हताप्राप्त कर्मचार्‍यांना व नगरपंचायतीमध्ये रोजंदारी तत्त्वावर कार्यरत व समायोजणास अर्हताप्राप्त कर्मचार्‍यांचीदेखील नियुक्ति केली जाणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अतिरिक्त असलेल्या पात्र उमेदवारांची नेमणूक करून पदे भरण्यात येणार आहे.
मात्र या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर व आवश्यक आदेश निर्गमित झाल्यानंतर एक महिन्याच्याआत जी अतिरिक्त कर्मचार्‍यांची यादी मजीप्राद्वारा देण्यात येणार आहे. त्या यादीतील पात्रकर्मचार्‍यांची नेमणूक करून पदे भरण्यात येणार आहेत.
यानंतरही पदे रिक्त राहत असतील तर नवनिर्मित पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. नव्याने निर्माणहोणार्‍या नगर परिषदा नगर पंचायती यांच्या करिता निकषानुसार आकृतीबंध निर्माण करण्यात व त्याअनुषंगाने पदनिर्मितीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. नगर परिषद प्रशासनाचे आयुक्तांनी याविषयीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचे आदेश दिले आहे.
ही पदभरती ५ ऑगस्ट २0१६ पर्यंत करण्याचे शासनाचे आदेश आहे. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीमध्ये नगरपालिका प्रशासनाचे उपआयुक्त व याच विभागाचे उपसंचालक सदस्य आहेत. मंत्रिमंडळ समितीने १३ ऑगस्ट २0१४ रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार ज्या नगर पंचायतींची मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली ही कमीतकमी ९0 टक्के असेल अश्याच नगर पंचायतीमध्ये वेतन व नियमित नवृत्ती वेतनासाठी १00 टक्के सहायक अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. नगर पंचायतीच्या लोकसंख्येच्या आधारावर आकृतीबंध व पदनिर्मिती
■ ५ हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीमध्ये प्रत्येक १८ पदाचा आकृतीबंध राहणार आहे. अशा एकूण ८ नगरपंचायतींमध्ये १४४ पदांच्या आकृतीबंधार मान्यता देऊन तेवढीच पदे निर्माण करण्यात येणार आहे.
■ ५ ते १0 हजार लोकसंख्या असणार्‍या ३0 नगरपंचायतीकरिता प्रत्येकी २0 पदांचा आकृतीबंधाप्रमाणे ६00 पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली.
■ १0 ते २५ हजार लोकसंख्या असलेल्या ५६ नगर पंचायतीमध्ये २९ पदांचा आकृतीबंध याप्रमाणे १,६२४ पदांच्या आवृतीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे.
मुख्याधिकार्‍यांच्या १३७ पदांचे निर्माण
■ अधिनियमातील तरतूदीनुसार १३७ नवनिर्मित नगरपरिषद व नगरपंचायतीकरिता ९३00-३४,८00, ग्रेडवे ४,४000 या वेतनश्रेणीत १३७ मुख्याधिकार्‍यांची पदे निर्माण करण्यात आली. यासाठी ४ कोटी ८८ लाख रुपयांचे वार्षिकअनुदान मंजूर करण्यात आलेली आहेत. या १0१ नगरपरिषद, नगरपंचायतीकरिता आकृतीबंध ■ या आकृतीबंधात नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, भिवापूर, कुही; वर्धा जिल्ह्यातील कारंजा, समुद्रपूर, सेलू, आष्टी; भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, मोहोडी, साकोली, लाखनी; चंद्रपूर जिल्ह्यातील पोभुर्णा, साकली, जिवती, गोंडपिपरी, कोरपना, चिमूर; गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, मुलचेटा, अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, धानोरा, कुटखेडा, कोरची, आरमोरी; गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनी, गोरेगांव, अर्जुनी, देवरी, सालेकसा, आमगाव; अमरावती जिल्ह्यातील तिवसा, धारणी, भातकुली, नांदगांव; यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी, बाभुळगाव, कळंब, मारेगाव, राळेगाव, महागाव यांचा समावेशआहे.