राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, भाजप 4, मित्रपक्ष 3 तर सेनेचे 2 जण घेणार शपथ

0
7

मुंबई-केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (शुक्रवारी) होणार आहे. उद्या सकाळी नऊ वाजता मंंत्रालयाच्या त्रिमुर्ती हॉलमध्ये शपथविधी होणार आहे. राज्यपालांना शपथविधीचं आमंत्रण देण्यात आले आहे.यावेऴी 4 भाजपचे, 3 मित्रपक्षांचे तर दोघे शिवसेनेचे आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले गेले आहे.मित्रपक्षातून सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विनायक मेटे शपथ घेणार आहे. तर शिवसेनाकडे आमदार गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर यांची नावं जवळपास निश्चित झाली आहे. तर भाजपमधून पश्चिम महाराष्ट्रातून सांगलीला प्राधान्य मिळण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये सुरेश खाडे यांचं नाव निश्चित झाल्याची शक्यता आहे.

तर शिवाजीराव नाईक यांचे नावही आघाडीवर आहे. मराठवाड्यातून सुधाकर भालेराव, संभाजी पाटील निलंगेकर यांची नावंही चर्चेत आहेत. तर विदर्भातून पांडुरंग फुंडकर, डॉ संजय कुटे, मदन येरावर यांची नावे आघाडीवर आहेत. तसेच उत्तर महाराष्ट्रातून जयकुमार रावल यांचे नाव निश्चित मानले जात आहे तर हरिभाऊ जावळेंच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे उद्या कोण कोण शपथ घेते याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागले आहे.तर काही विद्यमान राज्यमंत्र्याना बढती देण्यात येऊ शकते यामध्ये प्रा.राम शिंदे,दिलीप कांबळे यांचा समावेश आहे.