माजी सभापती लक्ष्मीबाई रहांगडाले यांचे निधन

0
9

गोंदिया – सडक अर्जुनी पंचायत समितीच्या प्रथम माजी सभापती, डव्वाच्या माजी सरपंच, शेतकरी लीला बचतगटाच्या संस्थापक अध्यक्षा व डव्वा येथील माजी पं.स.सदस्य डॉ.डी.बी.रहांगडाले यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई रहांगडाले यांचे दीर्घ आजाराने उपचारादरम्यान ५ जुलै रोजी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास निधन झाले.
६ जुलै रोजी डव्वा येथील मोक्षधामवर दुपारी २ वा. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६0 वर्ष होते. त्यांच्या मागे पती,२ मुले,२ मुली व मोठा आप्त परिवार आहे.