वैनगंगा नदीत ब्रम्हपुरीचे दोघे वाहून गेले

0
9

पवनी,दि.07 :भंडारा जिल्हयातील पवनीजवळील वैनंगाग नदीवर असलेले गोसेखुर्द धरण पाहण्यासाठी आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथील पर्यटकांपैकी दोघेजण वाहून गेल्याची घटना बुधवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. मोहम्मद झायद अली लखानी (१३) व सोहेल बदानी (३५) असे वाहून गेलेल्यांची नावे आहेत. बुधवारी दुपारी ब्रम्हपुरीहून ३0 ते ३५ जण कुटुंबासह गोसेखुर्द धरण पाहण्यासाठी आले होते. दरम्यान शोयल हा मुलगा धरणाच्या गेटजवळ बसला असताना त्याला शेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही,आणि शेल्फी घेण्याचा प्रयत्नात त्याचा तोल गेला आणि नदीच्या प्रवाहात वाहू लागला. तेव्हा त्या मुलाला वाचविण्यासाठी मोहम्मद यांने नदीत उडी घेतली. परंतु तेसुद्धा बराच वेळ बाहेर आले नाही. या घटनेची बातमी पोलिसांना देण्यात आली.रात्री उशीरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आले होते परंतु मृतदेह न मिळाल्याने पाण्याच्या प्रवाहात ते समोर गेले की कुठे आश्रय मिळाला असेल तर अडून आहेत, यासाठी पोलीसांनी आज गुरूवारी सकाळपासूनच शोधमोहीम सुरु केली आहे.