राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून राज्यात पहिला विजय अजित पवारांचा उमेदवाराचा झाला आहे. अजित पवार गटाच्या नेत्या अदिती तटकरे यांनी आपला विजय नोंदवला आहे.
ज 23 नोव्हेंबररोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. मतमोजणीला आता जवळपास 3 तास झाले असून यात महायुतीने राज्यात जोरदार आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. एकट्या भाजपनेच तब्बल 110 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपने 2014 मधील हा रेकॉर्ड आता मोडला आहे.त्यामुळे राज्याला आता भाजपचा मुख्यमंत्री मिळणार का, याबाबत चर्चा रंगत आहेत. (Maharashtra Assembly Results 2024 )
महायुतीमध्ये भाजप 110 जागा, एकनाथ शिंदे गट 49 जागा तर अजित पवार गट 34 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 83 जागांची आघाडी मिळाली आहे. यात कॉँग्रेस 26 जागा, उद्धव ठाकरे गट 30 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा 21 जागांवर आघाडी आहे.
मविआमधील बडे नेते सुद्धा सध्या पिछाडीवर दिसून येत आहेत. नाना पटोले, रोहित पवार हे पिछाडीवर दिसून येत आहे. तर,राज ठाकरे यांचा पक्ष मनसेने अद्याप भोपळा देखील फोडलेला नाही. आता हाती आलेल्या आकडेवारीनुसार, सर्व एक्झिट पोल राज्यात फेल ठरले आहेत. राज्यात भाजपाची त्सुनामी आल्याचे दिसून येत आहे.
भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते अजूनही पिछाडीवर असल्याने आता विरोधी पक्षाची माळ कोणत्या नेत्याच्या गळ्यात पडते, ते पाहणे देखील उत्सुकाचे ठरणार आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येणार, असं चित्र आता दिसून येत आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढाई रंगली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघांमध्ये अगदी काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत वरळीमध्ये सहा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंनी तब्बल 650 मतांनी आघाडी कायम ठेवली आहे. पण, मताधिक्य फार कमी असल्यामुळे ठाकरे गटाची धाकधूक वाढली आहे.
प्रजातंत्रच्या एक्झिट पोलनुसार राज्यातील कोणते 32 उमेदवार विजयी होणार?
- कोपरी-पाचपाखाडी – एकनाथ शिंदे, शिवसेना
- द. प. नागपूर – देवेंद्र फडणवीस, भाजप
- बारामती – अजित पवार, राष्ट्रवादी
- कामठी – चंद्रशेखर बावनकुळे, भाजप
- रामटेक – अपक्ष, चुरशीची लढत
- अहेरी – धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी
- भोकर – श्रीजया चव्हाण, भाजप
- कन्नड – उदयसिंग राजपूत, चुरशीची लढत
- पू. औरंगाबाद – इम्तियाज जलील, चुरशीची लढत
- सिल्लोड – अब्दुल सत्तार, शिवसेना
- येवला – छगन भुजबळ, राष्ट्रवादी
- दिंडोरी – सुनीता चारोसकर, राष्ट्रवादी (शरद पवार)
- बेलापूर – संदीप नाईक, राष्ट्रवादी (शरद पवार)
- जोगेश्वरी पूर्व – अनंत नर, शिवसेना ठाकरे गट
- वर्सोवा – हारुन खान, शिवसेना
- अंधेरी पूर्व – मुरजी पटेल, शिंदे गट
- शिवडी – अजय चौधरी, शिवसेना ठाकरे गट
- मुंबादेवी – अमीन पटेल, काँग्रेस
- महाड – स्नेहल जगताप, शिवसेना ठाकरे गट
- दापोली – संजय कदम, शिवसेना ठाकरे गट
- उ. कोल्हापूर – राजेश क्षीरसागर, शिवसेना
- कागल – हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
- तासगाव – रोहित पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार)
- जत – विक्रमसिंह सावंत, काँग्रेस
- द. सोलापूर – सुभाष देशमुख, भाजप
- माळशिरस – उत्तम जानकर, राष्ट्रवादी (शरद पवार)
- सांगोला – बाबासाहेब देशमुख, शेकाप
- कोरेगाव – शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी (शरद पवार)
- माढा – अभिजीत पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार)
- वाई – मकरंद पाटील, राष्ट्रवादी
- पलूस कडेगाव – राष्ट्रवादी
- इस्लामपूर – जयंत पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार)
- मिरज – सुरेश खाडे, भाजप