शिवस्मारकासाठी 3600 कोटींच्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता

0
5
मुंबई, दि. 26 – आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा मुद्दा चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी 3 हजार 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. आचारसंहितेतही निवडणूक आयोगाच्या परवानगीने निधी मंजूर केला जाईल, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.
दरम्यान, निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाल्यास टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे उद्धाटन करण्यात येईल, असे विनायक मेटे यांनी सांगितले आहे. शिवस्मारक प्रकल्पासाठी लागणार निधी राज्य सरकारकडून उपलब्ध केला जाणार असून, यातील काही प्रमाणात निधी केंद्र सरकारकडून मिळणार असल्याचेही मेटेंनी सांगितले आहे.