23.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home महाराष्ट्र गृहखात्यावर आबांसारखा देवेंद्रांचा अंकुश नाहीच; स्मिता पाटील यांची टीका

गृहखात्यावर आबांसारखा देवेंद्रांचा अंकुश नाहीच; स्मिता पाटील यांची टीका

0
41

मुंबई- ‘माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा गृह खात्यावर अंकुश होता. राज्यात एखादी महत्त्वाची घटना घडली की ते तत्काळ तिथे जात होते. विद्यमान मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मात्र गृह विभागावर वचक दिसत नाही. राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली असून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे योग्य नसून राज्याचे गृहमंत्रिपद हे स्वतंत्र व्यक्तीकडेच असले पाहिजे,’ अशी टीका राष्ट्रवादी युवती संघटनेच्या नूतन अध्यक्षा स्मिता अार. पाटील यांनी बुधवारी केली. स्मिता या अार. अार. पाटील यांच्या कन्या अाहेत.