26.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home महाराष्ट्र गोपीनाथ मुंडे स्मारक समितीतून एकनाथ खडसे बाहेर!

गोपीनाथ मुंडे स्मारक समितीतून एकनाथ खडसे बाहेर!

0
33

मुंबई,दि.02 : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे औरंगाबाद येथे स्मारक उभारण्यासंदर्भातील समितीच्या अध्यक्षपदी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची आज राज्य शासनाने नियुक्ती केली. या आधीचे महसूल मंत्री एकनाथ खडसे हे या समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे नगरविकास विभागाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंडे यांच्या कन्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. पर्यावरण मंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे हे अन्य मंत्री समितीचे सदस्य आहेत. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (१), नगरविकास विभागाचे सचिव (२), औरंगाबादचे विभागीय आयुक्त, औरंगाबाद महापालिका आयुक्त आणि सिडकोचे मुख्य्य प्रशासक (औरंगाबाद) हे अधिकारी सदस्य असून औरंगाबादचे जिल्हाधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव असतील

blank