अक्षयकुमार काळे 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी

0
10

नागपूर, दि. 11 – मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक अक्षयकुमार काळे यांची आज डोंबिवलीत होणाऱ्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अनेक वादविवादांनी गाजलेल्या यंदाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अक्षयकुमार काळे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मोठ्या फरकाने विजय मिळवला.
यंदा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अक्षयकुमार काळे यांच्यासह जयप्रकाश घुमटकर, मदन कुलकर्णी आणि प्रवीण दवणे असे चार उमेदवार रिंगणात होते. दरम्यान, रविवारी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या मतमोजणीत अक्षयकुमार काळे यांनी मोठी आघाडी घेतली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण 1074 मतदारांपैकी 899 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी 17 मते बाद झाली. त्यापैकी 700 हून अधिक मते अक्षयकुमार काळे यांना मिळाली. तर प्रवीण दवणे यांना 142, मदन कुलकर्णी यांना 27 आणि जयप्रकाश घुमटकर यांना 3 मते मिळाली.