राष्ट्रीय महामार्गांवरील दारुच्या दुकानांचं शटर बंद

0
16

नवी दिल्ली, दि. 15 – देशभरातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर असणारी दारुची दुकाने 1 एप्रिलपर्यंत हटवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र दुकान मालकांना मुभा देत जोपर्यंत परवाना आहे तोपर्यंत दुकान सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र 31 मार्चनंतर परवान्याचं नुतनीकरण केलं जाणार नाही असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. दारुची दुकाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून किमान 500 मीटर अंतरावर असली पाहिजेत असं न्यायालयाने सांगितलं आहे. तसंच दारुची बॅनर्स आणि जाहिराती हटवण्याचे आदेशही दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य सचिव आणि राज्य पोलीस प्रमुखांवर टाकण्यात आली आहे.