जळगाव जिल्ह्यात आई भाजपकडून, तर मुलगा शिवसेनेकडून आखाड्यात

0
8

जळगाव दि. 2 – : राजकारणाच्या आखाड्यात नातीगोती नेहमीच चर्चेची राहिली आहेत. कधी नेत्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्यावरुन, तर कधी घरातल्याच व्यक्ती एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्यावरुन. जळगाव जिल्ह्यात आईविरोधात मुलानेच शड्डू ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे.
जळगाव तालुक्यात म्हसावद बोरनार गटात आई लीलाबाई सोनवणे यांच्या विरुद्ध मुलगा पवन सोनावणे याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आई भाजपकडून, तर मुलगा शिवसेनेकडून आखाड्यात उतरला आहे. त्यामुळे आई विरुद्ध मुलगा, शिवसेना विरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत जिल्ह्याच्या दृष्टीने चर्चेची राहणार आहे.

गेल्या वेळी हा गट महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांच्या पत्नी लीलाबाई सोनावणे तिथून उभ्या राहिल्या आणि निवडूनही आल्या होत्या. दरम्यानच्या काळात दीर्घ आजाराने भिला गोटू सोनवणे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर ही पहिलीच जिल्हा परिषद निवडणूक होत आहे. त्यामुळे त्यांच्या जागेचा वारसदार कोण असा प्रश्न निर्माण झाला.लीलाबाई या भिला यांच्या पहिल्या पत्नी, तर पवन हे भिला यांच्या दुसऱ्या पत्नीचे चिरंजीव आहेत. पवन आणि लीलाबाई सोनावणे या दोघांनी शिवसेनेकडे आपली उमेदवारी मागितली होती, मात्र सेनेने पवन यांना उमेदवारी देऊ केल्याने लीलाबाई यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आपली उमेदवारी मिळवली.
पवनला आपल्याविरोधात उभे करुन आमच्या घरातील राजकारण संपवण्याचा विरोधकांचा डाव असल्याचं त्या सांगतात. मात्र शिवसेनेमुळे आपल्या वडिलांना या ठिकाणी निवडून येता आल्याने त्यांच्या इच्छेविरुद्ध आपण शिवसेना सोडणार नसल्याची भूमिका पवन यांनी घेतली