राज्यातील 11 हजार गावे दुष्काळमुक्त, सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध- राज्यपाल

0
8

मुंबई – सरकारने गेल्या अडीच वर्षांत राबवलेल्या महत्त्वपूर्ण योजनांचा आढावा घेतला.जलयुक्त शिवार योजनेतंर्गत राज्यातील 11 हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचा दावा राज्यपाल महोदयांनी केला. ‘मागेल त्याला तळे’, ही योजना सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला.गेल्या सहा महिन्यांत राज्याच्या गुंतवणुकीत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. औद्योगिक विकासाच्या देशपातळीवर महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा अग्रेसर ठरल्याचे प्रतिपादन राज्यपाल महोदयांनी केले.
दरम्यान, अधिवशेनाच्या पहिल्या दिवशीच विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे सरकारविरोधात घोषणा दिल्या. राज्यपालांचे अभिभाषण सुरु होताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.महाराष्ट्रातही शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस सरकारवर दबाव आणू, अशी भू्मिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांची रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण पाटलांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी हाच आमचा प्रमुख विषय असल्याचे स्पष्ट केले.
महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या मंत्र्यांना अचानक शेतकऱ्यांचा कळवळा आली आणि त्यांनी कर्जमाफीची मागणी केली. मात्र, हे शिवसेनेचे हे पुतना प्रेम आहे. मराठवाड्यात मागील दोन महिन्यांत १७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून सर्वाेच्च न्यायालयानेही शेतकरी आत्महत्यांवरून सरकारला फटकारले आहे. यामुळे हीच कर्जमाफीची योग्य वेळ असून मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी आता पंचांग काढून मुहूर्त शोधण्याचे नाटक बंद करावे. अन्यथा भाजपच्या कुंडलीत देश सोडून पळून गेलेल्या मल्ल्याची पाठराखण करण्याचा योग होता, असे लोक बोलतील, असा टोलाही विखेंनी या वेळी मारला.
मुंबई महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीच्या नाट्यावरून भाजप व शिवसेनेचा चेहरा खरा चेहरा राज्यातील जनतेसमोर आला. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला कौरव असल्याचा आरोप करताना पारदर्शक कारभाराचा आव आणून स्वत:ला पांडव म्हटले होते. पण महापौरपदाच्या भाजपने माघार घेतल्याने शिवसेनेप्रमाणेच फडणवीसांचा पक्षही काैरव असल्याचे दिसून आले. हे दोन्ही पक्ष दुर्योधन व दु:शासन आहेत. हे दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात खरे, पण आज महाराज असते तर भाजप-िशवसेनेचा टकमक टोकावरून कडेलोट केला असता, अशी टीका विखेंनी केली. निवडणुकांच्या प्रचारसभेत फडणवीस यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली. पण आता महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांच्यावरोधात लढण्याऐवजी सेनेशी भाजपने सेटिंग केली. आरोप केल्यावर विरोध करणे गरजेचे असताना फडणवीसांनी निवडणुकीतून पळ काढला. हा प्रकार म्हणजे माफियाराजचे समर्थन असून राज्यातील जनतेची पारदर्शक फसवणूक आहे याकडे विखे यांनी लक्ष वेधले.