26.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home शैक्षणिक पुन्हा पेपरफुटीः गणिताचा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल

पुन्हा पेपरफुटीः गणिताचा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल

0
24

नवी मुंबई- परिक्षेपूर्वी बारावीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल होण्याच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. आज पार पडलेला बारावीचा गणिताचा पेपरही परिक्षेच्या काही मिनिटांपूर्वी व्हायरल झाल्याचं समोर आलं आहे.
यापूर्वी बारावीचा मराठीचा, वाणिज्य शाखेचा एसपीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला होता. मात्र कोणीतरी मोबाईलमधील वेळ बदलून परीक्षा सुरु झाल्यानंतर हे पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल केल्याचं बोर्डाचं म्हणणं होत.
दरम्यान, मराठी पेपर फुटी प्रकरणी वाशी पोलिसांनी मालाडवरून दोघांना तर कांदिवलीतून दोघांना अटक केली आहे. यांच्याकडे पेपर कसा आला याबाबत वाशी पोलीस तपास करीत आहेत. याचदरम्यान आज गणिताचा पेपर लीक झाल्याचं समोर आलं आहे.