जाळपोळ, हत्यांमध्ये अप्रत्यक्ष सहभाग; गडचिरोलीतील घटनांचा साईबाबा मास्टरमाइंड

0
6

गडचिरोली दि.११: दिल्ली विद्यापीठाचा प्रा. जी. एन. साईबाबा हा शारीरिकदृष्ट्या अपंग असला तरी देशभरातील अनेक माओवादी हिंसक कारवायांत त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता. जाळपोळ, हत्या, अपहरण आदी प्रकरणांत मास्टरमाइंड म्हणून त्याने काम केले आहे. हिंसेच्या माध्यमातून येथील लोकशाही व्यवस्था खिळखिळी करण्यासाठी हातात शस्त्रे घेण्याचे आवाहन करून सनसनाटी निर्माण करणो, हाच त्याचा प्रमुख उद्देश असल्याचे उघडकीस आले आहे.
२00४ मध्ये माओवाद्यांच्या विविध संघटना एकत्र येऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या संघटनेची स्थापना करण्यात आली. पुढच्याच वर्षी स्थापन झालेल्या रिव्हॅल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट (आरडीएफ) या संघटनेचा तो उपसचिव झाल्यानंतर व्यवस्थेविरुद्ध सशस्त्र बंडखोरी आणि हिंसक कारवाया करण्यासाठी युवकांचे संघटन बांधणो, हातात शस्त्रे घेऊन लोकशाही व्यवस्था उलथवून टाकण्याचे युवकांना आवाहन करणो, हाच साईबाबाचा मुख्य उद्देश असल्याचे निदर्शनास येते. विशेष म्हणजे दिल्लीत प्राध्यापकी करतानाच युवकांच्या मदतीने कट रचून त्याने गडचिरोलीत हिंसाचार घडवून आणला होता.
१९८२ मध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीनंतर नक्षलवाद्यांनी वेगवेगळय़ा हिंसक घटना घडवून आणल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाची प्रगती खुंटली असून जिल्हा निर्मितीच्यावेळी जशी परिस्थिती होती तशीच थोड्या फार फरकाने आजही आहे. पोलीस खबर्‍या असल्याच्या संशयावरून सामान्य नागरिकांची हत्या करणो, पोलीस जवानांचे बळी घेणो, जाळपोळ करून शासकीय मालमत्तेचे नुकसान करणो आदी कामांमध्ये साईबाबा सहभागी होता. १९८0 पासून नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत आतापर्यंत ४७४ सामान्य नागरिकांच्या हत्या केल्या आहेत. तर ३१२ सामान्य नागरिक जखमी झाले आहेत. तसेच नक्षली हिंसाचारात आतापर्यंत जिल्ह्यात १९१ पोलीस शहीद झाले असून ५११ पोलीस जखमी झाले आहेत. २0 स्पेशल पोलीस ऑफिसर (एसपीओ) च्या हत्यासुद्धा त्यांनी केल्या आहेत. नक्षलवाद्यांच्या विविध सप्ताहादरम्यान हिंसक कारवाया आणि जाळपोळ करून नक्षलवाद्यांनी आतापर्यंत २९ कोटी, २0 लाख, ३७ हजार, ३१५ रुपयाच्या मालमत्तेचे नुकसान केले आहे. यात सरकारी मालमत्तेच्या नुकसानाचा आकडा १0 कोटी ७ लाख ३0 हजार २९९ रुपये तर खासगी मालमत्तेचा १८ कोटी ५0 लाख ७ हजार १६ रुपयांचा समावेश आहे. ९ मे २0१४ रोजी दिल्ली येथून अटक करण्यात आलेल्या जी. एन. साईबाबाला ४ एप्रिल २0१६ रोजी वैद्यकीय कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाल्यानंतरही त्याच्या विचारांच्या संघटनांनी ४ एप्रिल २0१६ ते ९ मार्च २0१७ यादरम्यान गडचिरोलीत हिंसक कारवायांचे सत्र सुरूच ठेवले. यादरम्यान एकूण ७२ गुन्हे दाखल करण्यात आले. यात पोलिसांच्या हत्यांचे (चकमक, हल्ला, ब्लास्ट) २ गुन्हे, इतर खुनांचे १५ गुन्हे, चकमकीचे ३४ गुन्हे, इतर ३0७ चे १२ गुन्हे, दरोड्याचे २ गुन्हे, जाळपोळ नुकसानीचे २ गुन्हे आणि ५ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. यादरम्यान नक्षली कारवायांत दोन पोलीस शहीद झाले तर २0 पोलीस जखमी झाले. तसेच एकूण २२ नागरिकांचा मृत्यू होऊन ५३ नागरिक जखमी झाले. तसेच या कालावधीत नक्षल्यांकडून सरकारी मालमत्तेचे नुकसान ४२ लाख ९८ हजार असून खासगी मालमत्तेच्या नुकसानीचा आकडा ३ कोटी २६ लाख ५२ हजार रुपये आहे.